मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

मराठमोळ्या सचित पाटीलचं छोट्या पडद्यावर धमाकेदार पुनरागमन! 'या' मालिकेतून येणार भेटीला

मराठमोळ्या सचित पाटीलचं छोट्या पडद्यावर धमाकेदार पुनरागमन! 'या' मालिकेतून येणार भेटीला

मराठीमध्ये मालिका (Marathi Serial) आपल्या भेटीला येत आहेत. विशेष म्हणजे या मालिकांमधून मराठीतील अनेक प्रसिद्ध कलाकार छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. नुकताच अभिनेता श्रेयश तळपदे, प्रार्थना, बेहेरे, मुक्ता बर्वे, उमेश कामत यांसारख्या अनेक अभिनेत्यांनी छोट्या पडदयावर पुनरागमन केलं आहे. त्यांनतर आता अभिनेता सचित पाटील (Sachit Patil) छोट्या पडद्यावर एकदम दमदार एंट्री करत आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई,29ऑक्टोबर- मराठीमध्ये मालिका (Marathi Serial) आपल्या भेटीला येत आहेत. विशेष म्हणजे या मालिकांमधून मराठीतील अनेक प्रसिद्ध कलाकार छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. नुकताच अभिनेता श्रेयश तळपदे, प्रार्थना, बेहेरे, मुक्ता बर्वे, उमेश कामत यांसारख्या अनेक अभिनेत्यांनी छोट्या पडदयावर पुनरागमन केलं आहे. त्यांनतर आता अभिनेता सचित पाटील (Sachit Patil) छोट्या पडद्यावर एकदम दमदार एंट्री करत आहे. त्यामुळे सचितचे चाहते फारच खुश आहेत.

२३ नोव्हेंबरपासून स्टार प्रवाहवर 'अबोली ' ही नवी मालिका सुरु होतेय. या मालिकेत अभिनेता सचित पाटील इन्सपेक्टर अंकुश ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. सचितला याआधी आपण ग्लॅमरस आणि रोमँटिक रुपात पाहिलं आहे. त्यामुळे अबोली मालिकेतला त्याचा हा नवा अंदाज प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, यात काहीच शंका नाही.

या भूमिकेविषयी सांगताना सचित म्हणाला, ‘मी खूपच उत्सुक आहे. स्टार प्रवाह सारख्या वाहिनी सोबत काम करताना खूपच आनंद होतोय. मी पहिल्यांदाच स्टार प्रवाहसोबत काम करतोय. मी सगळ्या मालिका आवर्जून पहातो. लिखाणाच्या दर्जापासून कलाकारांचा अभिनय आणि दिग्दर्शन या सर्व गोष्टी मला भावतात. त्यामुळे खूप दिवसांपासून या कुटुंबाचा भाग होण्याची इच्छा होती. अबोली मालिकेच्या निमित्ताने हा योग जुळून आलाय. या मालिकेत मी इन्सपेक्टर अंकुश ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. मी माझ्या करिअरच्या पहिल्या सिनेमात पोलिस इन्सपेक्टरची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता अबोली मालिकेत मी पुन्हा खाकी वर्दी परिधान करणार आहे. मालिकेचा विषयही खूप छान आहे. अबोली नावाच्या मुलीच्या संघर्षाची ही गोष्ट आहे. छोट्या पडद्यामुळे तुम्ही दररोज प्रेक्षकांच्या घरात पोहोचता त्यांच्या कुटुंबाचा भाग होता. अबोली मालिकेच्या निमित्ताने माझी प्रेक्षकांशी नेहमी भेट होईल त्यामुळे उत्सुकता वाढली आहे.’

(हे वाचा:PHOTO : सुयश-आयुषीने लग्नानंतर घेतलं जोतिबा आणि अंबाबाईचं दर्शन!)

अभिनेता सचित पाटील मराठीतलं एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून ओळखला जातो . त्यानं २००३ मध्ये 'क्यों' या सस्पेन्स थ्रिलर हिंदी चित्रपटातून पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याने 'सब कुछ है,कुछ भी नही' आणि 'रास्ता रोको'मध्ये काम केलं आहे. २००७ मध्ये त्याने डायरेक्टर म्हणून 'साडे माडे तीन' हा चित्रपट बनवला होता. त्यांनतर त्याने २०१० मध्ये अवधूत गुप्तेच्या 'झेंडा' चित्रपटातून मराठीमध्ये पदार्पण केलं होतं. 'क्षणभर विश्रांती' या मल्टिस्टारर चित्रपटात सचित पाटीलला प्रचंड पसंत करण्यात आलं होतं. त्याला मराठीतील की रोमँटिक हिरो म्हणून पाहिलं जातं. सचित पाटीलने २०१८ मध्ये बिग बॉस फेम वीणा जगतापसोबत 'राधा प्रेम रंगी रंगली' ही लोकप्रिय मालिका केली होती. पुन्हा एकदा आपल्या कलाकाराला मालिकेच्या माध्यमातून दररोज भेटता येणार त्यामुळे चाहते फारच उत्सुक आहेत.

First published:

Tags: Marathi entertainment