'थुकरटवाडी'त सचिनची फटकेबाजी

'थुकरटवाडी'त सचिनची फटकेबाजी

चला हवा येऊ द्या' च्या थुकरटवाडीत मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर याने हजेरी लावली.

  • Share this:

17 मे : झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' च्या थुकरटवाडीत  मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर याने हजेरी लावली.  या भागात सचिनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीबरोबरच आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील अनेक गोष्टींबाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. या कार्यक्रमाचं २२- २३ मे रोजी सोमवार आणि मंगळवारच्या भागात रसिकांना अनुभवता येणार आहे.

''चला हवा येऊ द्या'' च्या सेटवर सचिनचे आगमन होताच रसिकांनी “सचिन सचिन” अशा आरोळ्यांनी सभागृह दणाणून सोडले. यावेळी वयाच्या ११ व्या वर्षी मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि खेळासाठी १२ व्या वर्षापासून घरापासून दूर राहू लागलो. या दरम्यान घरच्यांबरोबरचे अनेक क्षण मी ‘मिस’ केलेत पण त्याची तक्रार मी कधी करणार नाही कारण क्रिकेट ही माझी निवड होती. त्यामुळे क्रिकेटसाठी अनेक गोष्टीचा मला त्याग करावा लागला असं लोक म्हणतात. मी त्याला त्याग वगैरे म्हणणार नाही. ते माझं आयुष्य होतं. मी स्वप्नांचा पाठलाग करत होतो. ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मला जे करता आलं ते सगळं मी केलं अशी भावना सचिनने व्यक्त केली.

 

सचिनच्या सोबत त्याची पत्नी अंजली, त्याचे भाऊ नितीन तेंडुलकर, अजित तेंडुलकर, बहीण सविता तेंडुलकर, तसेच त्याचे मित्र अतुल रानडे, जगदीश चव्हाण आणि अजित भुरे हेही चला हवा येऊ द्या च्या सेटवर आवर्जून हजर होते.

First published: May 17, 2017, 8:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading