मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Sachin Pilgaonkar B'day: बडे अच्छे लगते है! वाढदिवसादिवशी महागुरुंची पत्नी अन् लेकीबरोबर रंगली मैफिल

Sachin Pilgaonkar B'day: बडे अच्छे लगते है! वाढदिवसादिवशी महागुरुंची पत्नी अन् लेकीबरोबर रंगली मैफिल

ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. महागुरुंचा लेक आणि पत्नीबरोबरचा गाण्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. महागुरुंचा लेक आणि पत्नीबरोबरचा गाण्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. महागुरुंचा लेक आणि पत्नीबरोबरचा गाण्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

    मुंबई,  17 ऑगस्ट : मराठी सिनेसृष्टीला लाभलेल्या काही मल्टिटॅलेंडेट कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेते सचिन पिळगावकर. अनेक वर्ष सचिन पिळगावकर लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. आजही त्यांचा चाहता वर्ग कमी झालेला नाही. कधी अभिनेता, कधी दिग्दर्शक, गायक तर कधी महागुरु म्हणून सिचन पिळगावकर प्रेक्षकांच्या भेटील येत राहिले. मराठी सिनेसृष्टीत अनेक वर्ष मोलाची कामगिरी करणारे सचिन पिळगावकर आज त्यांचा  65 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांच्या वाढदिवशी त्यांच्या एकुलत्या एका लेकीनं म्हणजेच अभिनेत्री श्रिया पिळगावकरनं वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. मराठी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन कपल म्हणजे सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर. दोघेही गेली 33 वर्ष सुखाचा संसार करत आहे. दोघांचे वाढदिवसही एकाच महिन्यात एकामागून एक असतात. कालच म्हणजे  16ऑगस्ट सुप्रिया पिळगावकर यांचा वाढदिवस झाला आणि आज म्हणजेच 17 ऑगस्टला. ऑगस्ट महिना दोघांसाठीही खास असतो. यानिमित्तानं संपूर्ण कुटुंब बिझी शेड्यूलमधून वेळ काढून एकत्र वाढदिवस साजरा करतात. दोघांचा वाढदिवस असल्यानं लेक श्रिया देखील प्रचंड खुश असते. हाच आनंद सगळ्यांबरोबर शेअर करत श्रियानं वडिलांच्या जुन्या सिनेमातील गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. हेही वाचा - Sachin Pilgaonkar B'day: गालावरच्या खळीनं केलं क्लीनबोल्ड! तुम्हाला माहितेय का सचिन-सुप्रियांची Love Story सचिन पिळगावकर यांचा प्रवास मराठी सिनेसृष्टीपासून सुरू झाला. त्यांनी फार कमी वेळात हिंदी सिनेसृष्टीतही काम केलं आणि नुसत काम केलं नाही तर आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केला.  त्यांचा हिंदीमधील सर्वांत गाजलेला सिनेमा म्हणजे 'बालिका वधू'. सिनेमाची कथा त्यातील कलाकार आणि सिनेमाच्या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. सिनेमातील 'बडे अच्छे लगते हैं' हे गाणं आजही प्रेक्षकांचं आवडतं गाणं आहे. प्रेक्षकांप्रमाणे श्रियाचं देखील हे सर्वांत आवडतं गाणं आहे. हेच गाणं गात श्रियानं आई आणि बाबा दोघांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'आईचा बर्थ डे 16 ऑगस्ट आणि पप्पांचा 17 ऑगस्ट. दोघांवर माझं खूप खूप प्रेम आहे.  पप्पांच्या बालिका वधू या माझ्या आवडत्या सिनेमातील सर्वांत आवडतं गाणं आहे. या स्पेशल व्हिडीओनं आजचा स्पेशल दिवस सेलिब्रेट करुया', असं म्हणत श्रियानं स्वत: बडे अच्छे लगते है हे गाणं गायलं आहे. गाण्यात सचिन आणि सुप्रिया दोघांनीही लेकीला उत्तम साथ दिली आहे.
    Published by:Minal Gurav
    First published:

    Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment

    पुढील बातम्या