मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /10वर्षांनी लहान मुलीशी लग्न, अभिनयातील करिअर फ्लॉप नंतर...; महागुरूंच्या आयुष्यातील या गोष्टी माहितीये का?

10वर्षांनी लहान मुलीशी लग्न, अभिनयातील करिअर फ्लॉप नंतर...; महागुरूंच्या आयुष्यातील या गोष्टी माहितीये का?

Sachin Pilgaonkar

Sachin Pilgaonkar

अभिनेते सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत ‘गीत गाता चल’, ‘बालिका वधू’, ‘अखियों के झरोखे’ आणि ‘नदिया के पार’ यांसारख्या अनेक शानदार चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या.

  मुंबई, 03 मे :  फार कमी लोक असे असतात ज्यांना करिअरच्या सुरुवातीच्या काळात यश मिळतं; पण जेष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांना वयाच्या चौथ्या वर्षापासूनच प्रेक्षकांकडून वाहवा मिळाली. मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी स्वतःच्या प्रतिभेचा ठसा उमटवला. या अभिनेत्याच्या चित्रपटाने एकेकाळी ‘शोले’ आणि ‘जय संतोषी माँ’ यासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांशीही स्पर्धा केली होती. त्यांच्या चित्रपटात ग्लॅमर, सस्पेन्स किंवा अ‍ॅक्शन असं काही नसतानाही तो चित्रपट सुपरडूपर हिट ठरला. मग अशी कोणती कमतरता होती, ज्यामुळे सचिन पिळगावकर कधीच आघाडीचे अभिनेते होऊ शकले नाहीत आणि ते दिग्दर्शनाकडे वळाले.

  अभिनेते सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत ‘गीत गाता चल’, ‘बालिका वधू’, ‘अखियों के झरोखे’ आणि ‘नदिया के पार’ यांसारख्या अनेक शानदार चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. या चित्रपटांद्वारे त्यांनी प्रेक्षकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केलं. त्यावेळी एक निर्माता असाही होता ज्याने आधी सचिन यांना साईन केले आणि नंतर चित्रपटाच्या कथेचा विचार केला. अभिनयाच्या क्षेत्रात इतकं काम करूनही सचिन यांना योग्य स्थान मिळू शकलं नाही. एका मराठी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते 10 वर्षांनी लहान असलेल्या सुप्रिया सबनीस यांच्या प्रेमात पडले. सचिन यांनी सुप्रियाला प्रपोजही केलं आणि नंतर ते दोघे लाइफ पार्टनर बनले.

  हेही वाचा - रामायणाच्या एका एपिसोडसाठी लागायचे इतके लाख; पण खर्चापेक्षा कमाई होती चौपट; आकडा पाहून धक्काच बसेल!

  'या' चित्रपटांमधून दिसली सचिन पिळगावकर यांची जादू

  बालकलाकार म्हणून मोठं यश मिळाल्यानंतर सचिन यांना काम मिळालं नाही, असं कधी झालं नाही. मोठं झाल्यावर करिअरमध्ये त्यांनी गीत गाता चल या पहिल्या चित्रपटात अभिनेता म्हणून काम केलं. जय संतोषी माँ, शोले सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसोबत प्रदर्शित झालेला हा चित्रपट जोरदार चर्चेत राहिला. 1975 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट हिट ठरला. हा चित्रपट राजश्री प्रॉडक्शनचा होता. सचिन पिळगावकर यांनी राजश्री प्रॉडक्शनच्या अखियों के झरोके से आणि नदिया के पार या आणखी दोन शानदार चित्रपटांमध्ये काम केलं. हे दोन्ही चित्रपट त्यावेळी चर्चेत होते.

  चित्रपटाचं दिग्दर्शन करताना पडले प्रेमात

  अभिनयातील करिअर फ्लॉप झाल्यानंतर सचिन दिग्दर्शनाकडे वळाले आणि हिंदीसोबतच मराठीत ‘नवरी मिळे नवऱ्याला’ हा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटासाठी ते नवीन चेहऱ्याच्या शोधात होते. त्यांचा शोध सुप्रिया सबनीसवर थांबला. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सचिन सुप्रियाच्या प्रेमात पडले. दहा वर्षांनी लहान असणाऱ्या सुप्रियाला त्यांनी प्रपोज केलं. ‘नवरी मिळे नवऱ्याला’ हा चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर एक वर्षाने सचिन आणि सुप्रिया विवाहबद्ध झाले.

  सचिन चित्रपटसृष्टीत 2020 पर्यंत अॅक्टिव्ह होते. त्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत खूप काम केलं. 2018 मध्ये त्यांचा अभिनेत्री राणी मुखर्जीसोबतचा ‘हिचकी’ हा हिंदी चित्रपट तर स्वप्नील जोशी स्टारर ‘रणांगण’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. 2019 मध्ये ते हॉटस्टारच्या मायानगरी- सिटी ऑफ ड्रिम्समध्ये दिसले होते. दिग्दर्शक म्हणून ‘अशी ही आशिकी’ हा त्यांचा अखेरचा मराठी चित्रपट 2019 मध्ये आला होता. त्यांच्या खासगी जीवनाविषयी बोलायचं तर सचिन आणि सुप्रियाची मुलगी श्रेया हीदेखील चित्रपटांमध्ये अभिनय करते. शाहरुख खानच्या ‘फॅन’ या चित्रपटातून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं.

  First published:
  top videos

   Tags: Life18, Marathi cinema, Marathi entertainment, Marathi news