VIDEO : महागुरूंनी सांगितला आयुष्याचा मंत्र

अनिरुद्ध दाते या जिंदादिल व्यक्तीची कथा आहे. ती भूमिका अर्थातच आपले महागुरू साकारतायत.आयुष्यावर प्रेम करायला वयाची सीमा नसते हे हा सिनेमा सांगतो.

News18 Lokmat | Updated On: Dec 21, 2018 05:58 PM IST

VIDEO : महागुरूंनी सांगितला आयुष्याचा मंत्र

मुंबई, 21 डिसेंबर : लव्ह यु जिंदगी असं नुसतं म्हटलं की काय आठवतं? अर्थातच, आलिया भट्ट आणि शाहरुखच्या डिअर जिंदगी सिनेमातलं गाणं. पण आता असंच म्हणतायत सचिन पिळगावकर.


“लव यु जिंदगी” चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये भव्यतेने प्रदर्शित झाला. सचिन पिळगावकर, कविता लाड मेढेकर, प्रार्थना बेहरे यांची  प्रमुख भूमिका या सिनेमात आहेत. सिनेमाचा विषय आहे कौटुंबिक. अनिरुद्ध दाते या जिंदादिल व्यक्तीची कथा आहे. ती भूमिका अर्थातच आपले महागुरू साकारतायत.आयुष्यावर प्रेम करायला वयाची सीमा नसते हे हा सिनेमा सांगतो.


चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन मनोज सावंत यांचं आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिला चित्रपट आहे. चित्रपटात अनिरुद्ध दाते यांची भूमिका सचिन पिळगावकर यांनी केली आहे. अनिरुद्ध दातेच्या बायकोच्या भूमिकेत कविता लाड मेढेकर आहेत. प्रार्थना बेहरे अनिरुद्ध दातेची तरुण मैत्रीण आहे. तिचं नाव रिया. प्रार्थना आणि कविताच्या व्यक्तिरेखा एकमेकांना भिडणार आहेत.

Loading...याशिवाय अतुल परचुरे आणि समीर चौघुले यांनी नेहमीप्रमाणे आपल्या सहज अभिनयाने आपापल्या भूमिकेला सजवलं आहे. चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन समीर सापतिस्कर यांनी केलंय. चित्रपटाला साजेसं छायाचित्रण  पराग देशमुख यांचं आहे. सिनेमातल्या गाण्यांना आवाज अवधूत गुप्ते आणि सचिन पिळगावकर यांनी दिलाय. लव यु जिंदगी चित्रपटाची पटकथा श्रीपाद जोशी आणि मनोज सावंत तर संवाद गणेश पंडित आणि श्रीपाद जोशी यांनी लिहिले आहेत. 11 जानेवारीला चित्रपट रिलीज होईल.


याशिवाय  दिग्दर्शक गजेंद्र अहिरे 'सोहळा' हा सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. महागुरू सचिन पिळगावकर यांची सिनेमात मुख्य भूमिका आहे.नातेसंबंधातील झालेल्या बदलाचं चित्रण या सिनेमात करण्यात आलं आहे.


PHOTOS: रिसेप्शन प्रियांका-निकच्या लग्नाचं...चर्चा फक्त सायनाच्या लूकची

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 21, 2018 05:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...