सोनाली-सिद्धार्थची 'गुलाबजाम'ची रेसिपी

सोनाली-सिद्धार्थची 'गुलाबजाम'ची रेसिपी

दिग्दर्शक सचिन कुंडलकर घेऊन येत आहेत नवा सिनेमा - गुलाबजाम.

  • Share this:

31 मार्च : सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर ही काहीशी हटके जोडी आता सिनेमात दिसणार आहे. रेस्टॉरंट, गंध, अय्या, राजवाडे अॅण्ड सन्स, हॅपी जर्नी, वजनदार या सिनेमांनतर दिग्दर्शक सचिन कुंडलकर घेऊन येत आहेत नवा सिनेमा - गुलाबजाम.नावातच गुलाबजाम आहे त्यामुळे हा सिनेमा चवीने खाणाऱ्यांसाठी असणार यात शंका नाही.

नुकतंच या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आलं आणि 'आमच्या रेसिपीला सुरुवात झाली' असं त्यावर लिहिण्यात आलंय.शेफच्या पोशाखात असणारा सिद्धार्थ चांदेकर आणि गृहिणीच्या भूमिकेत दिसणारी सोनाली कुलकर्णी यांच्या पोस्टरने सिनेमाविषयी उत्कंठा वाढवलेय.

या सिनेमाच्या शूटिंगला आज सुरुवात होणार असून अजून चित्रपट प्रदर्शित होण्यास अर्थातच अवकाश आहे. सचिन कुंडलकर, सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांची ही नवी रेसिपी खमंग होईल अशी आशा करूया.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 31, 2017 03:46 PM IST

ताज्या बातम्या