'सचिन : अ बिलियन ड्रीम्स' राज्यात टॅक्स फ्री

'सचिन : अ बिलियन ड्रीम्स' राज्यात टॅक्स फ्री

  • Share this:

27 मे : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे. 'क्रिकेट देव' अशी उपाधी असलेल्या सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर असलेल्या 'सचिन-अ बिलियन ड्रीम्स' हा सिनेमा टॅक्स फ्री करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

याआधी ओडिसा, केरळ आणि छत्तीसगड या तीन राज्यांनी सचिनचा हा सिनेमा करमुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सचिनवरचा हा सिनेमा करमुक्त करणारं महाराष्ट्र हे चौथं राज्य आहे.

'सचिन : अ बिलियन ड्रिम्स' आज देशभरात इंग्रजी, हिंदी, मराठी आणि इतर भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे. डॉक्युमेंट्री फिचर प्रकारातील या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळातोय. फर्स्ट डे फर्स्ट शोपासून या सिनेमाचे अनेक शो हाऊसफुल्ल सुरू आहेत. त्यामुळे हा सिनेमा चांगली कमाई करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

First published: May 27, 2017, 9:05 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading