कोणी डिझाइन केलाय 'विरानुष्का'च्या लग्नाचा ड्रेस?

कोणी डिझाइन केलाय 'विरानुष्का'च्या लग्नाचा ड्रेस?

आयुष्याच्या या सुंदर क्षणी ते दोघंही अगदी सुंदर दिसत होते. हीच सुंदरता खुलावणारा त्यांचा सुंदर ड्रेस त्यांनी प्रसिद्ध डिझाइनर सब्यसाची मुखर्जी यांच्याकडून खास डिझाइन करून घेतला होता.

  • Share this:

12डिसेंबर : बाॅलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. इटलीत हा शानदार विवाहसोहळा पार पडला. विराटने टि्वट करून लग्नाची बातमी जाहीर केलीये. आता मुंबईत 21 डिसेंबरला ग्रँड रिसेप्शन आहे. आयुष्याच्या या सुंदर क्षणी ते दोघंही अगदी सुंदर दिसत होते. हीच सुंदरता खुलावणारा त्यांचा सुंदर ड्रेस त्यांनी प्रसिद्ध डिझाइनर सब्यसाची मुखर्जी यांच्याकडून खास डिझाइन करून घेतला होता.

मीडियाच्या वृत्तानुसार, सब्यसाची यांनी गेल्या आठवड्यात लग्नाच्या ड्रेस संदर्भात या जोडप्याची भेट घेतली होती. मेहंदीपासून ते लग्नापर्यंतच्या ड्रेसपर्यंत सगळं डिझाइन सब्यासाची यांचं होतं.

त्यांच्या या लग्नसोहळ्याचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर गाजत असतानाच सब्यासाची यांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून विराट आणि अनुष्काच्या ड्रेसचे फोटो शेअर केले आहेत.

विरानुष्काच्या लग्नाच्या बातमीने दोघांच्याही फॅन्समध्ये एक आनंदाची लहर उमटलीय. आता सगळे वाट बघतायत वधू-वर परत भारतात येण्याची. कारण मुंबईत 21 डिसेंबरला या जोडीचं ग्रँड असं रेसिप्शन होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2017 12:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading