मुंबई, 27 मार्च- बॉलिवूडचा
(Bollywood) हॅन्ड्सम हंक अभिनेता हृतिक रोशन
(Hrithik Roshan) सध्या त्याच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अलीकडे त्याचं नाव सबा आझादसोबत जोडलं जात आहे. हृतिक रोशन आणि सबा आझाद
(Saba Azad) यांच्यातील वाढती जवळीकता सर्वांनाच दिसून येत आहे. बऱ्याचवेळा दोघेही एकत्र वेळ घालवताना आणि हँगआउट करताना दिसून येतात. परंतु,आता हृतिक आणि सबा आझाद लवकरच आपलं नातं अधिकृतपणे जाहीर करतील असंच दिसून येत आहे.
हृतिकनं त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आधीच सबा आझादसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं सूचित केलं होतं. आणि आता सबा आझादनेही हृतिक रोशनला डेट करत असल्याची काहीशी हिंट दिली आहे. तिने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने तिचा म्युझिकल पार्टनर आणि एक्स बॉयफ्रेंड इमाद शाहसोबतच्या कॉन्सर्टचा उल्लेख केला आहे.
आपल्या कॉन्सर्ट व्हेन्यूची एक झलक शेअर करत, सबा आझादने तिच्या चाहत्यांना या कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. या पोस्टमध्ये सबा आझादए लिहिलंय- 'सनबर्न आणि तयारी. आम्ही साउंडचेकिन (मॅडबॉय लिंक) वर संध्याकाळी 6 वाजता येणार आहोत. पुण्यात आमच्यासोबत धम्माल करा.'' तर दुसरीकडे हृतिक रोशनने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडिओ शेअर केला आणि लिहिलं- 'किल इट, अप्रतिम स्त्री. माझी इच्छा आहे की मी देखील तिथे असावं'.असं म्हणत हृतिकने सर्वांचं लक्ष केंद्रित केलं होतं.

त्यांनतर सबाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडीओ रिपोस्ट करत उत्तर देत लिहिलं आहे की, "माझीही इच्छा आहे की तुही इथं असावंस, माझ्या क्यूट!!' यासोबतच तिने स्माईली इमोजी शेअर केले आहेत. या पोस्ट पाहिल्यानंतर युजर्स विचारत आहेत की आता दोघांनी आपलं नातं अधिकृत केलं आहे का? अनेक युजर्स हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्यातील नात्याबद्दल खूप उत्सुक आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.