Home /News /entertainment /

VIDEO: महामिनिस्टरच्या रत्नागिरी केंद्रावर वहिनींचा धुमाकूळ, 'सामी' गाण्यावरचा धम्माल डान्स VIRAL

VIDEO: महामिनिस्टरच्या रत्नागिरी केंद्रावर वहिनींचा धुमाकूळ, 'सामी' गाण्यावरचा धम्माल डान्स VIRAL

 VIDEO: महामिनिस्टरच्या रत्नागिरी केंद्रावर वहिनींचा 'सामी' गाण्यावर धम्माल डान्स व्हायरल

VIDEO: महामिनिस्टरच्या रत्नागिरी केंद्रावर वहिनींचा 'सामी' गाण्यावर धम्माल डान्स व्हायरल

महामिनिस्टरचा (Mahaminister) खेळ हा आता रत्नागिरी केंद्रावर रंगाणार आहे. खेळाआधीच रत्नागिरी केंद्रावरील एका वहिनींचा धम्माल डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  मुंबई, 22 मे: सध्या टेलिव्हिजनवर आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरीतील वहिनींमध्ये एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे 11 लाखांच्या पैठणीची (11Lakh Paithani)  महाराष्ट्राचं महावस्त्र असलेली ही लाख मोलाची पैठणी कोणाला मिळाणार याहीपेक्षा ती कशी असणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. महाराष्ट्राचे लाडके आदेश भावोजी यांच्याबरोबर दररोज संध्याकाळी 6 वाजता महामिनिस्टरचा (Mahaminister) खेळ रंगत आहे. महाराष्ट्रातील कानोकोपऱ्यातून वहिनी या खेळात सहभागी होत आहेत. सध्या महामिनिस्टरची वारी थेट जाऊन पोहोचली आहे कोकणतल्या रत्नागिती जिल्ह्यात. महामिनिस्टरच्या रत्नागिरी केंद्रावर देखील वहिनींनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. याच रत्नागिरी केंद्रावरील सहभागी झालेल्या एक वहिनींचा धम्माल डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. झी मराठीने (Zee Marathi) त्यांना इन्स्टाग्रामवर महामिनिस्टरच्या रत्नागिरी केंद्रावरील वहिनींच्या धम्माल डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत वहिनी फार आनंदाने 'पुष्पा'  (Pushpa)  सिनेमातील 'सामी सामी' (Saami Saami) या गाण्यावर दिलखुलास नाचताना दिसत आहेत. वहिनींचा डान्स  नेटकऱ्यांच्याही पसंतीस उतरला असून आतापर्यंत या व्हिडीओ 55 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी वहिनींचं कौतुक करत महामिनिस्टरच्या संपूर्ण टीमचे देखील आभार मानले आहेत. हेही वाचा -  देवमाणूस फेम अभिनेत्रीनं घेतली नवीकोरी कार, किंमत आहे इतक्या लाखांच्या घरात!
  महामिनिस्टरच्या आजच्या भागात पनवेल केंद्रावरुन एक वहिनी महामिनिस्टर ठरणार आहेत. त्यानंतर रत्नागिरी केंद्रावर महामिनिस्टरचा खेळ रंगणार आहे. रत्नागिरीत खेळ खेळण्यासाठी आदेश भावोजी आधीच रत्नागिरीला पोहोचले असून महामिनिस्टरच्या तयारीला लागले आहेत. आदेश बांदेकरांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून त्यांचा रत्नागिरीतील प्रवास सर्वांसोबत शेअर केला आहे. 'I Love Ratnagiri' असं म्हणतं त्यांनी फोटो देखील शेअर केला आहे. रत्नागिरीत पोहोचताच त्यांनी स्थानिक हॉटेलात जाऊन चहा आणि कांदा भजीचा आस्वादही घेतला. महामिनिस्टरच्या टीमने आतापर्यंत ठाणे, नाशिक, नागपूर, सोलापूर, पुणे, औरंगाबाद,पनवेल इत्यादी केंद्रावर जाऊन महामिनिस्टरच्या अंतिम खेळासाठी प्रत्येक केंद्रावरुन वहिनींची निवड केली आहे. रत्नागिरी दौऱ्यानंतर महामिनिस्टरची टीम कोल्हापूर दौऱ्यावर निघणार आहे. महाराष्ट्राचं महावस्त्र येवल्याची 11 लाखांची पैठणी कोणत्या वहिनी जिंकणार याकडे आता सर्वांच लक्ष लागून आहे.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi entertainment, Zee Marathi

  पुढील बातम्या