Saaho Trailer : सुपरस्टार प्रभासचा हॉलिवूडपेक्षाही जबरदस्त अ‍ॅक्शन अवतार!

Saaho Trailer : सुपरस्टार प्रभासचा हॉलिवूडपेक्षाही जबरदस्त अ‍ॅक्शन अवतार!

प्रभासनं या सर्व अ‍ॅक्शन सीन्स खूप मेहनत घेतली असून त्यानं सिनेमामधील त्याच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे.

  • Share this:

मुंबई, 11 ऑगस्ट : मागच्या बऱ्याच काळापासून चर्चेत असलेला सिनेमा ‘साहो’चा ट्रेलर रिलीज झाला असून यामध्ये साउथ सुपरस्टार प्रभास एका पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसत आहे. तर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर एका क्राइम ब्रांच ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय यामध्ये नील नितिन मुकेश, जॅकी श्रॉफ, महेश मांजरेकर यांच्यासारखे दिग्गज अभिनेते खलनायकांच्या भूमिकेत दिसत आहेत. तसेच प्रकाश बेलावडी, मंदिरा बेदी आणि मुरली शर्मा यांच्याही या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

साहोच्या स्टंटसाठी खास मेहनत

साहोचे दिग्दर्शक सुजीत यांनी या सिनेमातील सर्व स्टंट सीनसाठी खास मेहनत घेतली आहे. या सिनेमातील अनेक सीन्स हे हॉलिवूडच्याही स्टंटना सुद्धा मागे टाकताना दिसतात. प्रभासनंही या सर्व अ‍ॅक्शन सीन्स खूप मेहनत घेतली असून त्यानं सिनेमामधील त्याच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. बाहुबलीनंतर बॉलिवूडमध्येही प्रभासच्या चाहत्यांची संख्या वाढली आहे.

VIDEO : संगतीचा परिणाम! अतरंगी ड्रेसमुळे दीपिका पदुकोण झाली ट्रोल

साउथ सिनेमांवर आधारित आहे सिनेमाची कथा

या ट्रेलरमध्ये दिसत असलेल्या कथेनुसार हा सिनेमा माफिया आणि एक शक्तीशाली पोलिस ऑफिसरच्या यांच्यातील संघर्षावर आधारित आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमधील डायलॉग आणि सीन्स पाहता हा सिनेमा साउथ सिनेमांच्या बेसवर आधारित आहे. सिनेमात प्रभास आक्रमक भूमिकेत दिसत आहे.

पावसाचा फटका मालिकांनाही! तरीही कलाकारांनी म्हटलं, शो मस्ट गो ऑन

श्रद्धा कपूर-प्रभासचा रोमँटिक अंदाज

या सिनेमाची गाणी अगोदरच रिलीज झाली असून यात श्रद्धा आणि प्रभास यांच्या जोडीच खूप कौतुक केलं जात आहे. मात्र ट्रेलरमध्ये तिचा मर्यादित अभिनय दिसून येतो. अ‍ॅक्शनच्या बाबतीत तिचा मागचा सिनेमा बागीची आठवण येते. तर रोमांसच्या बाबतीत पहिल्यांदाच अभिनेता तिच्यावर भारी पडताना दिसत आहे. सर्वच रोमँटिक सीन्समध्ये प्रभास तिच्याहून सरस वाटतो.

पावसात फिरायला निघाली शिल्पा शेट्टी, पण ड्रेसनं 'असा' दिला दगा

साहोच्या रिलीजच्या बाबतीत बराच गोंधळ झालेला दिसून ला सुरुवातीला हा सिनेमा 15 ऑगस्टला रिलीज होणार होता मात्र त्यानंतर काही दिवसांपूर्वीच या सिनेमाची रिलीज डेट अचानकपणे बदलण्यात आली. त्यानंतर आता हा सिनेमा 30 ऑगस्टला रिलीज होणार आहे. यामुळे श्रद्धाच्या छिछोरे सिनेमाच्या रिलीजची डेट बदलण्यात आली आहे.

======================================================

पुरातून वाचवताना निसटला आणि झाडाला अडकला, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 11, 2019 10:34 AM IST

ताज्या बातम्या