प्रभाससाठी काहीपण! लाडक्या अभिनेत्याला भेटण्यासाठी जपानी चाहत्यांनी केली चक्क भारत वारी

प्रभाससाठी काहीपण! लाडक्या अभिनेत्याला भेटण्यासाठी जपानी चाहत्यांनी केली चक्क भारत वारी

प्रभासचा 'साहो' हा एक अ‍ॅक्शन थ्रिलर सिनेमा असून नव्या पोस्टरमध्ये तो इंटेस लुकमध्ये दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 08 जून : बाहुबली आणि बाहुबली 2च्या तगड्या यशानंतर दाक्षिणात्य अभिनेता प्रभासच्या चाहत्यांमध्ये मोठ्या संख्येनं वाढ झाली. त्याचे चाहते फक्त भारतातच नाहीत तर परदेशातही त्याच्या चाहत्यांची वाढत चालली आहे. पण परदेशातील चाहत्यांमध्ये जपानमधील चाहत्यांची संख्या सर्वाधिक आहे. भारतातील चाहत्यांचं प्रभासवरील प्रेम आपण नेहमीच पाहतो पण जेव्हा प्रभासच्या जपानी चाहत्यांनी चक्क प्रभासला भेटण्यासाठी जपान ते भारत असा प्रवास केला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आणि विशेष म्हणजे या चाहत्यांमध्ये मुलींची संख्या जास्त आहे.

बॉलिवूडचा ‘हा’ स्टार शुटिंग नसेल तर करतो शेती

नुकतीच प्रभासच्या काही जपानी चाहत्यांनी भारताला भेट दिली. त्यांनी यावेळी प्रभासला भेटायचं ठरवलं आणि ते थेट हैदराबादला त्याच्या घरी पोहोचले. यातील काही मुलींनी त्याच्या घरासमोर पोज देत फोटो काढले. त्यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. याआधी प्रभासनं त्याच्या जपानी चाहत्यांसाठी एक पत्र लिहून त्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

उर्वशी रौतेलाची चोरी पुन्हा पकडली गेली, 'या' अभिनेत्याचा मेसेज केला कॉपी पेस्ट

सध्या प्रभास त्याचा आगामी सिनेमा साहो सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या सिनेमाचं शूटिंग आता अंतिम टप्प्यात असून हा लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचं नवं पोस्टर लाँच करण्यात आलं. 'साहो' हा एक अ‍ॅक्शन थ्रिलर सिनेमा असून नव्या पोस्टरमध्ये प्रभास इंटेस लुकमध्ये दिसत आहे.

या सिनेमाचं दिग्दर्शन सुजीत यांनी केलं असून प्रभास बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय नील नितिन मुकेश, जैकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे यांच्या सुद्धा या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये रिलीज होणार आहेत.

VIDEO- 'या' अभिनेत्रीच्या घरात घुसलं माकड, बेडरूममध्ये घातला हैदोस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 8, 2019 09:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading