मुंबई, 17 जुलै : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला सिनेमा ‘साहो’ मागच्या बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमातील सय्या सायको हे गाणं रिलीज झालं. ज्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हा सिनेमा येत्या 15 ऑगस्टला रिलीज होणार होता. मात्र आता या सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. काही दिवसांपासून या सिनेमासोबतच बॉलिवूडमधील आणखी दोन सिनेमे रिलीज होणार असल्यानं बॉक्स ऑफिसवर चुरस पाहायला मिळेल असं म्हटलं जात होतं मात्र आता असं होणार नाही.
नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार बहुप्रतिक्षीत ‘साहो’ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. या आधी हा सिनेमा येत्या 15 ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्य दिनाला रिलीज होणार होता. मात्र आता या तारखेत बदल करण्यात आले असून आता हा सिनेमा ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस रिलीज होणार आहे. 15 ऑगस्टला 2 तेलुगू सिनेमा सुद्धा रिलीज होत आहेत. तेलुगू अभिनेता शर्वानंद स्टारर ‘रणरंगम’ (Ranarangam) आणि अदिवी शेषचा ‘एवरू’ (Evaru) हे सिनेमा 15 ऑगस्टला रिलीज होत असल्यानं साहोच्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आला असून हा सिनेमा 30 ऑगस्टला रिलीज होणार आहे.
VIRAL : 13 बॉलिवूड अभिनेत्रींचा हा VIDEO पाहून नाही बसणार विश्वास
याशिवाय 15 ऑगस्टला बॉलिवूडमध्ये ‘मिशन मंगल’ आणि ‘बाटला हाऊस’ हे दोन सिनेमे रिलीज होणार आहेत. त्यामुळे बॉक्स ऑफिसवरील टक्कर पाहता साहोच्या निर्मात्यांनी हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता प्रभासच्या चाहत्यांना आणखी काही काळ सिनेमाच्या प्रदर्शनाची वाट पाहावी लागणार आहे.
'नच बलिये'च्या सेटवर अभिनेत्रीने राहुल महाजनच्या मारलं थोबाडीत, समोर आलं कारण
साहो हा एक अक्शन थ्रिलर सिनेमा असून अभिनेत्री श्रद्धा कपूर सुद्धा या सिनेमामध्ये स्टंट सीन करताना दिसणार आहे. साहो सिनेमात प्रभास आणि श्रद्धा कपूरशिवाय नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर, चंकी पांडे, अरुण विजय आणि मुरली शर्मा यांसारखे तगडे कलाकार असणार आहेत. सुजीतने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून वामसी, प्रमोद आमि विक्रम यांनी साहो सिनेमाची निर्मिती केली आहे. बाहुबलीनंतर प्रभासचा हा दुसरा सिनेमा असणार आहे. यासोबतच पहिल्यांदा प्रभास आणि श्रद्धाची हिट जोडी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.
Sacred Games 2 - इस बार त्रिवेदी भी नहीं बचेगा!
===========================================================
SPECIAL REPORT: टेमघर धरणाची गळती थांबली? जलसिंचन विभागाच्या दाव्याची पोलखोल