Saaho Review : 'बाहुबली' प्रभासच्या 'साहो' सिनेमानं केली निराशा? प्रेक्षकांनी दिली 'ही' प्रतिक्रिया

Saaho Review : 'बाहुबली' प्रभासच्या 'साहो' सिनेमानं केली निराशा? प्रेक्षकांनी दिली 'ही' प्रतिक्रिया

‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’ सारखे सुपरहिट सिनेमा दिल्यानंतर प्रभासच्या ‘साहो’कडून चाहत्यांच्या खूप अपेक्षा होत्या.

  • Share this:

मुंबई, 30 ऑगस्ट : ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’ सारखे हिट सिनेमा देऊन सुपरस्टार बनलेला अभिनेता प्रभासनं पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार एंट्री केली आहे. प्रभासची मुख्य भूमिका असलेला साहो हा सिनेमा नुकताच रिलीज झाला असून या सिनेमासाठी प्रभासनं 100 कोटींचं मानधन घेतलं असल्याचं बोललं जात आहे. सर्वात मोठं बजेट आणि दोन वर्षांचा वेळ घेत तयार करण्यात आलेला हा सिनेमा आज (30 ऑगस्ट) रिलीज झाला. या सिनेमाला प्रेक्षाकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रभासचा हा अ‍ॅक्शनपट अनेकांच्या पसंतीत उतरला तर काहींनी मात्र या सिनेमावर नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. बाहुबलीच्या अनेक चाहत्यांनी त्याच्या या सिनेमाची तिकीटांची प्री बुकींग केली होती. मात्र अनेकांनी सिनेमा पाहिल्यावर ज्या प्रकारे रिअ‍ॅक्शन दिल्या आहेत त्यावरुन तर प्रभासच्या चाहत्यांची साहोनं निराशा केल्याचं दिसतं.

‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’ सारखे सुपरहिट सिनेमा दिल्यानंतर प्रभासच्या ‘साहो’कडून चाहत्यांच्या खूप अपेक्षा होत्या. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अनेकांनी त्याच्या अ‍ॅक्शनचं कौतुक केलं होतं मात्र प्रत्यक्ष सिनेमाच्या रिलीजनंतर हा सिनेमा प्रेक्षकांच्या अपेक्षांमध्ये खरा उतरला नसल्याचं चित्र आहे. पण स्वतः प्रभासला मात्र ‘साहो’ बाहुबलीचे रेकॉर्ड्स मोडेल असा विश्वास वाटतो. पाहूयात साहोच्या पब्लिक रिअ‍ॅक्शन...

आईच्या बांगड्या विकून विद्या बालननं भरलं हॉटेलचं बिल!

एका युझरनं लिहिलं, मी आत्ताच साहो पाहिला, सिनेमा मध्यांतरापर्यंत खूप चांगला आहे. मात्र त्यानंतर या सिनेमाच्या अनेक सीन्समध्ये प्रमाणापेक्षा जास्त अ‍ॅक्शन सीन आणि खराब CGI इफेक्टमुळे माझी खूपच निराशा झाली

तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, पूर्वीच्याच फॉरमॅटमध्ये बनवलेला अत्यंत खराब सिनेमा. या सिनेमाचा स्क्रिनप्ले खूपच कमजोर आहे आणि गाणी सुद्धा जबरदस्तीनं घुसवल्यासारखी वाटतात. अनेक सीन्समध्ये प्रभास स्वतः कम्फर्टेबल दिसत नाही. मात्र सिनेमाच पहिला हाफ खूप चांगला आहे.

'या' अभिनेत्याच्या घरात कामवाली बाई होती रानू मंडल

आणखी एका युजरनं लिहिलं, य सिनेमानं तर माझे पैसे वाया घालवले. एवढ्या मोठ्या बजेटचा हा सिनेमा एखाद्या बरबादी सारखी भासते. ट्वीस्ट सुद्धा खराब आहेत. तसेच खूप मोठ्या रनटाइममुळे हा सिनेमा वेळ खाऊ वाटतो.

अजय देवगणनं खरेदी केली नवी लक्झरी कार, देशात फक्त 2 व्यक्तींकडे आहे ही गाडी!

============================================================================

हिटलरसमोर जर्मनीला धूळ चारणारे मेजर ध्यानचंद यांची रोमहर्षक कहाणी

First published: August 30, 2019, 11:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading