अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडचं डोहाळे जेवण, पत्नी मेहर करतेय फंक्शनची तयारी ?

काही दिवसांपूर्वी अर्जुन त्याची पत्नी मेहर जेसिया सोबतही मुंबईमध्ये दिसला होता.

News18 Lokmat | Updated On: May 7, 2019 09:43 PM IST

अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडचं डोहाळे जेवण, पत्नी मेहर करतेय फंक्शनची तयारी ?

मुंबई, 7 मे : बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालनं काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवरून त्याच्या गर्लफ्रेंड गॅब्रिएलाच्या प्रेग्नन्सीची गुडन्यूज दिली होती. वयाच्या 44व्या वर्षी अर्जुन तिसऱ्यांदा बाबा बनणार आहे. पहिल्या पत्नीपासून अर्जुनला 2 मुली आहेत. अर्जुननं ही गोड बातमी शेअर केल्यानंतर त्यावर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. त्यानंतर तो कधी क्लिनिक बाहेर तर कधी डिनर डेटवर गॅब्रिएलासोबत स्पॉट झाला. तसेच तो काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी मेहर जेसिया सोबतही दिसला होता आणि त्यावरून सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा पाहायला मिळाल्या. पण सध्या मेहर गॅब्रिएलाच्या बेबी शॉवरची तयारी करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार लवकरच गॅब्रिएलाचा बेबी शॉवर होणार असून यासाठी अर्जुनची पत्नी मेहर या बेबी शॉवरची सर्व तयारी करणार आहे. बेबी शॉवरचं हे फंक्शन जी कंपनी ऑर्गनाइझ करत आहे त्या कंपनीसोबतच मेहर सुद्धा काम करते. काही दिवसांपूर्वीच मेहर आणि तिची मैत्रिण कल्याणी -आदित्य खांडेकर यांनी मिळून ही ही कंपनी सुरु केली आहे आणि ही कंपनी या संपूर्ण सेरेमनीची तयारी करणार आहे. गॅब्रिएलाचा बेबी शॉवर मुंबईमध्येच होणार असून यात अर्जुन आणि गॅब्रिएलाचे जवळचा मित्रपरिवार आणि नातेवाईक उपस्थित राहणार आहेत.




Loading...

 





View this post on Instagram




 

Blessed to have you and start all over again....thank you baby for this baby 👶🏽


A post shared by Arjun (@rampal72) on





काही दिवसांपूर्वी मुंबई मिररनं दिलेल्या वृत्तानुसार, मेहरला अर्जुनची गर्लफ्रेंड गॅब्रिएलाच्या प्रेग्नन्सीविषयी काहीच समस्या नाही असं तिनं सांगितलं. तिनं ही गोष्ट स्वीकारली आहे की, अर्जुन त्याच्या आयुष्यात पुढे गेला आहे. मेहर एक चांगली आई आहे आणि तिला आपल्या मुलींच्या भविष्यासाठी योग्य असलेली प्रत्येक गोष्ट करायची आहे.


Met Gala प्रियांकाच नव्हे, दीपिका, जेलो, सेरेना, किम कार्दाशियन आणि लेडी गागाने केला कहर


गॅब्रिएला ही दक्षिण आफ्रिकेची मॉडेल आहे. तिने २००९ मध्ये मिस इंडियन प्रिमिअर लीगमध्ये भाग घेतला होता आणि एफएचएमच्या जगातील १०० मादक महिलांमध्ये तिची निवड करण्यात आली. तिला खरी ओळख मिस IPL बॉलिवूड हा किताब जिंकल्यानंतर मिळाली. डेक्कन चारर्जसला ती रीप्रेझेंट करत होती. याशिवाय तिने काही सिनेमांमध्ये आणि म्युझिक व्हिडीओमध्येही दिसली होती.अर्जुन रामपालच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ZEE5 च्या वेब सीरिज 'द फायनल कॉल' मध्ये दिसला होता. अर्जुन आणि Gabriella ने अजूनपर्यंत लग्न केलेलं नाही.


प्रियांका चोप्राच्या 'मेट गाला लुक'वर नेटकरी सैराट, 'हे' भन्नाट मीम्स एकदा पाहाच


20 लाखांचं मंगळसुत्र, 90 लाखाची अंगठी, एवढे महागडे दागिने घालतात बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्री


VIDEO : बॉलिवूडचे सेलिब्रिटी भाजपचा प्रचार करतायत का? स्वरा म्हणते...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 7, 2019 09:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...