'बाहुबली' फेम अभिनेत्री करणार पाक क्रिकेटपटूशी लग्न? वाचा काय आहे सत्य

प्रभासच्या या खास अभिनेत्रीचे पाकिस्तान क्रिकेटपटूसोबतचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रभासच्या या खास अभिनेत्रीचे पाकिस्तान क्रिकेटपटूसोबतचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 06 मे : संपूर्ण जगाला भुरळ घातलेल्या बाहुबली-2 या चित्रपटानं नुकतीच 3 वर्ष पूर्ण केली. प्रभासची मुख्य भुमिका असलेल्या या चित्रपटानं जवळजवळ सर्व रेकॉर्ड मोडले होते. मात्र आता बाहुबली फेम अभिनेत्री पाकिस्तानी क्रिकेटपटूशी लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तामिळ, तेलगू तसेच बॉलिवडूमध्ये काम करणारी तमन्ना भाटिया पाक क्रिेकेटपटू अब्दुल रज्जाकशी लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान, तमन्नानं या सगळ्या अफवा असल्याचे सांगितले आहे. तमन्नानं सध्या केवळ चित्रपटांकडे लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले, सध्या लग्नाचा काहीही विचार नाही आहे. या सगळ्यात तमन्नाचा क्रिकेटपटू अब्दुल रज्जाकसोबतचा एक फोटो व्हायरल झाला आहे, यामुळं तमन्ना रज्जाकशी लग्न करणार असल्याच्या चर्चा होत आहेत. वाचा-अक्षय कुमारला 'गे' समजायची सासू, ट्विंकलशी लग्न करण्यासाठी ठेवली होती ही अट
    वाचा-VIDEO : इम्तियाज अलीच्या भावाच्या लग्नात ऋषी कपूर यांनी केला होता धम्माल डान्स तमन्ना आणि रज्जाक यांचा व्हायरल होत असलेला हा फोटो दुबईचा आहे. 2017मध्ये एका ज्वेलरी शॉपचे उद्घाटन करण्यासाठी तमन्ना आणि रज्जाक यांना प्रमुख पाहूणे म्हणून बोलवण्यात आले होते. त्यावेळी हा फोटो काढण्यात आला होता, मात्र आता 3 वर्षांनी पुन्हा हा फोटो व्हायरल केला जात आहे. वाचा-पाकिस्तानच्या 'या' क्रिकेटपटूला बायोपिकसाठी लीड रोलमध्ये हवा आहे सलमान खान मी अफवांकडे लक्ष देत नाही तमन्ना आणि रज्जाक यांचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्रींनं या सगळ्या अफवांवर मी लक्ष देत नाही सांगितले. तसेच, कधी अभिनेता, कधी क्रिकेटर तर कधी डॉक्टर. तुम्ही माझ्यासाठी मुलगा ठरवत राहा. मी काय बोलू यावर, असे सांगत मला प्रेम करायला आवडतं पण मी अफवांवर विश्वास ठेवत नाही, असेही तमन्ना म्हणाली. लॉकडाऊनमध्ये घरी आहे तमन्ना सध्या कोरोनामुळं लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशा परिस्थिती तमन्ना भाटिया आपल्या घरी अडकली आहे. सर्व सिनेमांचे शुटिंग बंद झाल्यामुळं तमन्ना घरी एकांतात वेळ घालवत आहे.
    First published: