प्रभु देवा दुसऱ्यांदा अडकला लग्नाच्या बेडीत? भाचीबरोबर लग्न करणार असल्याची होती चर्चा पण...

प्रभु देवा दुसऱ्यांदा अडकला लग्नाच्या बेडीत? भाचीबरोबर लग्न करणार असल्याची होती चर्चा पण...

सिनेकलाकारांचे आयुष्य त्यांच्या सिनेमांसाठी तर चर्चेत असतंच पण त्याचबरोबर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची देखील चर्चा होते. त्यांचे ब्रेकअप्स, रिलेशनशीप, लग्न, घटस्फोट नेहमीच चर्चेत असतात. दरम्यान अभिनेता प्रभु देवाच्या (Prabhu Deva) च्या बाबतीतही अशीच एक बातमी समोर येते आहे

  • Share this:

मुंबई, 21 नोव्हेंबर: बॉलिवूड (Bollywood) कलाकार त्यांच्या सिनेमांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतात. अभिनेता, डान्सर आणि दिग्दर्शक प्रभु देवा (Prabhu Deva) देखील सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. मीडिया अहवालानुसार प्रभु देवाने त्याच्या फिजीओथेअरपिस्टशी लग्नगाठ बांधली आहे. सप्टेंबरमध्येच त्याने विवाह सोहळा उरकला असून अद्याप त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

सोशल मीडियावरही याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. 1995 मध्ये प्रभु देवाने रामलथानशी लग्न केले होते, 16 वर्षानंतर त्याचा घटस्फोट झाला.  2008 मध्ये या दाम्पत्याने त्यांचा मोठा मुलगा गमावला होता, कॅन्सरमुळे त्याचं निधन झालं होतं. 2011 मध्ये त्याने घटस्फोट घेतला होता, त्यावेशी अभिनेत्री नयनताराच्या प्रेमात तो आकंठ बुडाला होता. 2010-2012 या कालावधी दरम्यान नयनतारा आणि प्रभु देवा डेट करत होते. मात्र आता पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक नातेसंबंधांबाबत चर्चा होऊ लागली आहे.

(हे वाचा-अभिनेते अनुपम खेर यांचा मुलगा सिकंदरने सोशल मीडियावरुन मागितलं काम)

चेन्नईतील काही मीडिया अहवालानुसार अभिनेत्याने मुंबईत एका मुलीशी सप्टेंबमध्ये लग्न केले आणि ते दोघेही चेन्नईमध्ये वास्तव्यास गेले आहेत. प्रभु देवाला या सर्वच गोष्टी खाजगी आणि गुप्त ठेवायच्या होत्या. मीडिया अहवालांच्या मते प्रभु देवा पाठदुखीवर उपचार करण्यासाठी या फिजिओथेअरपिस्टकडे गेला असता, त्यांची ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सूत्रांच्या माहितीनुसार प्रभु देवाने पारंपरिक पद्धतीने लग्न केलं आणि त्या दोघांनी हा विवाहसोहळ्याचा कार्यक्रम अत्यंत खाजगीमध्येच उरकला.

(हे वाचा-'...हे अजिबात सहन करणार नाही', रणवीरची नवीन जाहिरात पाहून भडकले सुशांतचे चाहते)

काही दिवसांपूर्वी प्रभु देवा त्याच्या भाचीशी लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पण मीडिया अहवालातील सूत्रांच्या माहितीनुसार प्रभु देवाने त्याच्या फिजीओथेअरपिस्टशी लग्न केलं असून ती त्याची भाची नाही आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर प्रभु देवा दिग्दर्शित 'राधे' (Radhe: your Most wanted Bhai) या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. यामध्ये सलमान खान (Salman Khan) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यावर्षीच हा सिनेमा प्रदर्शित होणार होता पण कोरोनामुळे (Coronavirus) राधेचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: November 21, 2020, 9:49 AM IST

ताज्या बातम्या