मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

OTT प्लॅटफॉर्मवर सिंघमची धांसू एन्ट्री, Ajay Devgan च्या जबरदस्त वेबसिरिजचा ट्रेलर OUT

OTT प्लॅटफॉर्मवर सिंघमची धांसू एन्ट्री, Ajay Devgan च्या जबरदस्त वेबसिरिजचा ट्रेलर OUT

Rudra:The Edge Of Darkness

Rudra:The Edge Of Darkness

अभिनेता अजय देवगणचा रुद्र ( Rudra:The Edge Of Darkness ) या या वेबसिरिज ट्रेलर रिलीज झाला आहे. सिनेमा जगतात सध्या याचीच चर्चा रंगली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर रुद्र या वेबसिरिजद्वारे अजय देवगण (Ajay Devgan) डेब्यू केले आहे.

  नवी दिल्ली, 30 जानेवारी: अभिनेता अजय देवगणचा रुद्र ( Rudra:The Edge Of Darkness ) या या वेबसिरिज ट्रेलर रिलीज झाला आहे. सिनेमा जगतात सध्या याचीच चर्चा रंगली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर रुद्र या वेबसिरिजद्वारे अजय देवगण (Ajay Devgan) डेब्यू केले आहे. रुद्र या वेबसिरिजमध्ये (Web series) अजय देवगण मुख्य भूमिकेत असून तो पुन्हा एकदा पोलीस (Police Officer) अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजयच्या वेबसिरिजची निर्मिती ही बीबीसी स्टुडिओ आणि एप्लॉईज एंटरटेनमेंटने बनविली आहे. ही सिरिज डिझ्नी प्लस हॉटस्टारवरही दिसणार आहे. त्याचा ट्रेलर नुकतंच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांची दाद मिळत आहे. अजय देवगणने या सिरिजमध्ये डीसीपी रुद्र वीर सिंगची भूमिका साकारली आहे. राशी खन्ना त्याची मैत्रीण आलिया बनली आहे. ईशा देओल या सिरिजमध्ये रुद्र म्हणजेच अजय देवगणच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

  अजयने या सिरिजचा ट्रेलर आपल्या सोशल मीडियावर शेअर करत खास कॅप्शन दिली आहे. ट्रेलर शेअर करताना अजय देवगणने लिहिले - प्रकाश आणि अंधार मधली रेषा... मी जिथे राहतो. असे त्याने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. अभिनेता अजय देवगणने रुद्रबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. तो म्हणाला, माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे की, काही वेगळं आणि प्रेषकांना हटके देण्याचा. नव्या आणि पॅशेनट लोकांबरोबर काम करण्याचा प्रयत्न राहिला आहे. यामुळे भारतातील सांस्कृतिक क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे. डिजिटलचे जग मला वेगवेगळ्या कारणांमुळे खुणावत असल्याचे त्याने म्हटले आहे. रुद्रमध्ये अजय देवगण, राशि खन्ना आणि ईशा देओलशिवाय अतुल कुलकुर्णी, अश्विनी काळसेकर, आशिष विद्यार्थी, सत्यदीप मिश्रा, तरुण गेहलोत हे देखील दिसणार आहेत. डिस्ने हॉटस्टारवर हिंदी व्यतिरिक्त ही सिरीज तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि बंगाली भाषेत प्रदर्शित होणार आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Ajay devgan, Entertainment, OTT

  पुढील बातम्या