मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /ऑस्करआधी RRRपुन्हा रिलीज करणार! पठाण समोर उभं राहणार मोठं चॅलेंज

ऑस्करआधी RRRपुन्हा रिलीज करणार! पठाण समोर उभं राहणार मोठं चॅलेंज

rrr release

rrr release

आरआरआर सिनेमानं जगभरात एकूण 1000 कोटींची कमाई केली आहे. आरआरआरच्या नावे सिनेक्षेत्रातील मोठे रेकॉर्ड आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 02 फेब्रुवारी : अभिनेता शाहरुख खानचा पठाण सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. सिनेमानं आतापर्यंत सगळ्या सिनेमांचे रेकॉर्ड मोडले आहेत. पठाणला टक्कर देणं आता कठीण झालं आहे असं म्हणत असताना साऊथ डिरेक्टर एसएसएस राजामौली मात्र पठाणला तगडी टक्कर देण्यासाठी सज्ज झाले आहेत. पठाण सुपरहिट होत असताना एसएसएस राजामौली यांचा आरआरआर हा सिनेमा पुन्हा एकदा रिलीज करण्याचं प्लानिंग करत आहेत. आरआरआर या सिनेमानं 2020वर्षात प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. अभिनेता राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर यांच्या जबरदस्त अॅक्शन आणि अभिनयानं सिनेमा एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला. सिनेमातील नाटूनाटू हे गाणं प्रचंड हिट झालं. गाण्याला ऑस्करच्या बेस्ट साँग लिस्टमध्ये नामांकन देखील मिळालं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 95वा ऑस्कर पुरस्कार घोषित होण्याआधी राजमौली आरआरआर हा सिनेमा पुन्हा एकदा रिलीज करणार आहे. सध्या ते थिएटर्स लिस्ट, भाषा आणि टायमिंगचं प्लानिंग करत आहेत. यंदाचा ऑस्कर सोहळा 12 मार्चला होणार आहे. ज्यात नाटू नाटू सिनेमाला नामांकन मिळालं आहे. ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या या गाण्यानं सगळ्यांना थिरकायला भाग पाडलं. दोघांची सिग्नेचर स्टेप चांगलीच हिट झाली आहे.

हेही वाचा -  Alia Bhatt: 'आता मुलगीच माझी पहिली....' आलिया भट्टने करियर बाबत घेतला मोठा निर्णय

आरआरआर सिनेमानं जगभरात एकूण 1000 कोटींची कमाई केली आहे. आरआरआरच्या नावे सिनेक्षेत्रातील मोठे रेकॉर्ड आहेत. राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरबरोबरच अभिनेत्री आलिया भट्ट, श्रिया सरन, अजय देवगण या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. अनेक नामांकित पुरस्कार सोहळ्यात आरआरआरचा सन्मान झाला आहे.

शाहरुखचा पठाण जवळपास 100 कोटींपर्यंत पोहोचला आहे. पहिल्या आठवड्यातच पठाणनं सगळे रेकॉर्ड्स मोडकळीस आणले आहेत. अशातच आता आरआरआर रिलीज झाल्यानंतर पठाणला मिळत असलेला प्रतिसाद कमी होतो की वाढतो याकडे सर्वांचं लक्ष आहे. त्याचप्रमाणे आरआरआरचं रि रिलीज कसं असणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.

First published:

Tags: Bollywood actor, Bollywood News, South film, South indian actor