Home /News /entertainment /

RRR चा स्टार ज्युनियर एनटीआर राहतो आलिशान घरात, कारच्या एका विशिष्ट नंबरमुळे असतो चर्चेत

RRR चा स्टार ज्युनियर एनटीआर राहतो आलिशान घरात, कारच्या एका विशिष्ट नंबरमुळे असतो चर्चेत

सध्या माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा ज्युनियर एनटीआर त्याच्या RRR चित्रपटामुळे सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. मात्र याशिवाय तो त्याच्या राहण्यावरून असेल किंवा कार प्रेम असेल यामुळे सतत चर्चेत असतो.

  मुंबई, 13 डिसेंबर - ज्युनियर एनटीआर(  JR NTR)आणि राम चरण दोघांच्याही आगामी 'आरआरआर' चित्रपटाची देशभरातील प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरने लाखो लोकांची उत्कंठा आणखीनच वाढवली आहे. सध्या 'आरआरआर'ची टीम त्याचे जोरदार प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. प्रमोशन दरम्यानच, चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी मुख्य अभिनेते राम चरण आणि एनटीआरबद्दल काही मनोरंजक गोष्टी उघड केल्या आहेत. या प्रमोशन दरम्यानाच अजय देवगणच्या आता माझी सटकली या डायलॉगची कॉपी करताना ज्युनियर एनटीआर( JR NTR Luxury Life)  दिसला. चाहत्यांना देखील त्याचा हा अंदाज भलताच आवडला. आज आपण या सुपरस्टारच्या आयुष्याबद्दल अशाच काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांचे नातू 1983 मध्ये हैदराबादमध्ये जन्मलेला ज्युनियर एनटीआर हा त्या काळातील लोकप्रिय अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांचे नातू आहेत. ज्युनियर एनटीआरला तारक या नावानेही संबोधले जाते. ज्युनियर एनटीआरने 2001 मध्ये स्टुडंट नंबर 1 सह मुख्य अभिनेता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ज्युनियर एनटीआर अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये दिसला आहे. सध्या ज्युनियर एनटीआर त्याच्या 'आरआरआर' चित्रपटामुळे सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. वाचा : 'सब बढिया, सब शानदार', Urvashi Rautela ने इस्रायलच्या माजी PM ना शिकवलं हिंदी कारच्या नंबरमुळे तर नेहमीच चर्चेत  ज्युनियर एनटीआरने त्याच्या अनेक चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी नंदी पुरस्कार, आयफा पुरस्कार, फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट तेलुगू पुरस्कार जिंकले आहेत. अभिनयाशिवाय ज्युनियर एनटीआर आणखी एका गोष्टीमुळे सोशल मीडियावर चर्चेक असतो. ते म्हणजे त्याच्या लक्झरी जीवनशैलीसाठीही आणि हो त्याच्या कार कलेक्शन आणि त्यांच्या कारच्या नंबरमुळे तर नेहमीच चर्चेत असतो. ज्युनियर एनटीआर 9999 हा आकडा खूप भाग्यवान मानतो. त्याच्याकडे एकाच क्रमांकाच्या   (JR NTR Car NO) अनेक गाड्या आहेत. Jr NTR ने त्याच्या BMW कारच्या नोंदणीसाठी फॅन्सी नंबर 9999 साठी 11 लाखांची बोली लावली आहे. यावरून तो खूप चर्चेत होता.
  View this post on Instagram

  A post shared by Jr NTR (@jrntr)

  राहतो अलिशान घरात ज्युबली हिल्स, हैदराबाद येथे असलेल्या एका आलिशान घरात ज्युनियर एनटीआर त्याच्या कुटुंबासह राहतो. या घराची किंमत सुमारे 25 कोटी आहे. राम चरण आणि चिरंजीवी ज्युनियर एनटीआरचे शेजारी आहेत. याशिवाय बंगळुरू आणि कर्नाटकमध्येही त्याची अनेक आलिशान घरे आहेत. वाचा : 'RRR' च्या ट्रेलरनंतर चर्चा फक्त राजामौलींची, मात्र स्वत:ला समजतात अपयशी? लग्नासाठी पाहावी लागली होती वाट ज्युनियर एनटीआरने 2011 मध्ये लक्ष्मी प्रणथी हिच्याशी लग्न केले. 2010 मध्ये ज्युनियर एनटीआरला लक्ष्मी प्राणथी हिच्यासोबत लग्न करायचे होते, पण त्यावेळी ती फक्त 17 वर्षांचा होता. त्यामुळे लक्ष्मी 18 वर्षांची होईपर्यंत हे लग्न पुढे ढकलण्यात आले.ज्युनियर एनटीआरची पत्नी लक्ष्मी ही प्रसिद्ध तेलुगू वृत्तवाहिनी "स्टुडिओ एन" चे मालक नरणे श्रीनिवास राव यांची मुलगी आहे. एवढेच नाही तर लक्ष्मीची आई चंद्राबाबू नायडू यांची भाची आहे. ज्युनियर एनटीआरशी लग्न झाले तेव्हा, लक्ष्मी अठरा वर्षांची होती. त्यावेळी ती हैदराबादच्या नजर ज्युनियर कॉलेजमधून इंटरमिजिएटचे शिक्षण घेत होती.
  बिग बॉसच्या दक्षिण व्हर्जनसाठी २५ कोटी रुपये मिळाले बिग बॉसच्या दक्षिण व्हर्जनसाठी त्याला २५ कोटी रुपये मिळाले यावरून ज्युनियर एनटीआरच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येतो. ही फी केबीसीचे तेलुगु व्हर्जन करणाऱ्या नागार्जुन आणि चिरंजीवीच्या फीपेक्षा जास्त होती. ज्युनियर एनटीआरने स्टुडंट नंबर 1, सिंहाद्री, बादशाह, टेंपर, जनता गर्जे आणि जय लवकुश यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता लवकरच त्याचा आरआरआर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bollywood News, Entertainment, Tollywood

  पुढील बातम्या