Home /News /entertainment /

RRR: ज्यु. NTR च्या एन्ट्रीवर चाहत्यांनी केलं असं काही की सर्वच झाले थक्क, पाहा VIDEO

RRR: ज्यु. NTR च्या एन्ट्रीवर चाहत्यांनी केलं असं काही की सर्वच झाले थक्क, पाहा VIDEO

RRR: एस.एस. राजामौली (S.S. Rajamauli) यांचा बहुचर्चित 'RRR' रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे.

  मुंबई, 26 मार्च-   एस.एस. राजामौली   (S.S. Rajamauli)  यांचा बहुचर्चित 'RRR' रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. या चित्रपटात साऊथ सुपरस्टार राम चरण  (Ramcharan)  आणि ज्युनियर एनटीआर   (Jr. Ntr)  मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपट रिलीज होताच प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे.रामचरण आणि Jr. NTR यांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. चाहते यांच्यासाठी वाटेल ते करायला तयार असतात. नुकतंच थिएटर्समध्ये आरआरआर पाहताना चाहत्यांनी असंच काहीसं केलं आहे. Jr. NTR च्या एन्ट्रीवर चाहत्यांनी अक्षरशः पैशाचा पाऊस पाडत त्याला प्रतिसाद दिल्याचं दिसून येत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल   (Viral Video)  होत आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वच थक्क होत आहेत. आरआरआरमध्ये Jr. NTR चा इंट्रोडक्शन सीन सुरु होताच. थिएटर्समधील चाहते मोठमोठ्याने ओरडू लागतात. त्याला चिअरअप करू लागतात. आनंद व्यक्त करू लागतात. इतकंच नव्हे तर स्क्रीनवर पैशांसारखं काहीतरी उधळत असतात. ते नेमकं नोटच आहेत का? हे जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत. प्रसिद्ध सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानीने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
  हा व्हिडीओ शेअर करताच प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. शिवाय प्रचंड कमेंट्ससुद्धा करत आहेत. एकाने कमेंट करत विचारलं आहे, 'ते पैसे आहेत का?' तर दुसऱ्याने लिहिलं आहे, 'ते नेमकं काय आहे?'. तर काहींनी लिहिलंय, 'तो बहुतेक पैसाच आहे'. या चित्रपटाचं कथानक क्रांतिकारी अल्लूरी सीताराम राजू आणि कोमाराम यांच्या भोवती फिरतं. ज्यांनी ब्रिटीश काळात आणि हैदराबाद निजामांविरोधात लढाई लढली होती. चित्रपटात एनटीआरला कोमाराम भीम आणि अभिनेता रामचरणला अल्लूरी सीतारामची भूमिका दिली आहे.तर अभिनेत्री आलिया भट्टने रामचरणच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. अभिनेता अजय देवगनसुद्धा यामध्ये मुख्य भूमिकेत आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, South indian actor, Tollywood, Video viral

  पुढील बातम्या