• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Naacho Naacho Song : RRR सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज; Jr NTR-Ram Charan चा भन्नाट डान्स

Naacho Naacho Song : RRR सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज; Jr NTR-Ram Charan चा भन्नाट डान्स

नाचो नाचो या गाण्याचा टीझर मंगळवारी रिलीज करण्यात आला असून आज हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. राम चरण आणि ज्युनियर एनटीआर नाचो नाचो गाण्यात बेधुंदपणे नाचताना दिसत आहेत.

 • Share this:
  मुंबई, 10 ऑक्टोबर : साऊथ इंडियन सिमेमाची क्रेज आता दक्षिणेतील राज्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. त्यामुळेच गेल्या काही वर्षात साऊथ इंडियन सिनेमे, सिनेमातील गाणी आणि तेथील स्टार्स आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. त्यामुळे तेथील निर्मातेही आता सिनेमा भारतासह जगभरात पोहोचवण्यासाठी हिंदी भाषेतही रिलीज करु लागले आहेत आणि त्याचा परिणामही जाणवू लागला आहे. आता एसएस राजामौली (SS Rajamouli ) दिग्दर्शित 'RRR' या चित्रपटातील गाणं काही तासांपूर्वी रिलीज झालं आहे. काही तासात हे गाणं प्रेक्षकांच्या पंसतीस उतरत आहे. 'RRR' सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर (Jr. NTR), राम चरण (Ram Charan), अजय देवगण (Ajay Devgan) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हा चित्रपट चर्चेच आहेत. आता या चित्रपटाचे पहिलं गाणं "नाचो नाचो..." रिलीज झालं आहे. नाचो नाचो या गाण्याचा टीझर मंगळवारी रिलीज करण्यात आला असून आज हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. राम चरण आणि ज्युनियर एनटीआर नाचो नाचो गाण्यात बेधुंदपणे नाचताना दिसत आहेत. दोघांना डान्स करताना पाहून चाहते खूप खूश झाले आहेत. त्यामुळे काही तासात यूट्युबला गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाल्या आहे. गाण्यात ज्युनियर एनटीआर आणि राम चरणने केलेला डान्स भन्नाट आहे. डान्स बघताना दोघांवरून नजर हटत नाही.
  राम चरणने पोस्ट केली शेअर राम चरणने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून नाचो नाचो गाण्याच्या रिलीजची माहिती दिली आहे. व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिले - या मास बीटवर नाचण्यापासून स्वत:ला थांबवू शकत नाही. हे गाणं आता रिलीज झालं आहे.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: