मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

रामचरण-उपासना अजूनही आईबाबा का बनले नाहीत? RRR स्टारच्या पत्नीचा चकित करणारा खुलासा

रामचरण-उपासना अजूनही आईबाबा का बनले नाहीत? RRR स्टारच्या पत्नीचा चकित करणारा खुलासा

साऊथ सुपरस्टार (South Superstar) राम चरणने (Ramcharan) आपल्या 'RRR' चित्रपटाच्या माध्यमातून जगभरातील चाहत्यांना वेड लावलं आहे. हा अभिनेता केवळ त्याच्या अभिनयामुळेच नव्हे तर खऱ्या आयुष्यातील सामाजिक कार्यांमुळेदेखील ओळखला जातो. त्याचे कित्येक चाहते तो वडील झाल्याची आनंदाची बातमी ऐकण्याची वाट पाहात आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 10 जुलै-   साऊथ सुपरस्टार (South Superstar) राम चरणने (Ramcharan) आपल्या 'RRR' चित्रपटाच्या माध्यमातून जगभरातील चाहत्यांना वेड लावलं आहे. हा अभिनेता केवळ त्याच्या अभिनयामुळेच नव्हे तर खऱ्या आयुष्यातील सामाजिक कार्यांमुळेदेखील ओळखला जातो. त्याचे कित्येक चाहते तो वडील झाल्याची आनंदाची बातमी ऐकण्याची वाट पाहात आहेत. अभिनेत्याने 2012 मध्ये उपासना कामिनेनी कोनिडेलाशी लग्न केलं होतं. या दोघांच्या लग्नाला 10 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र अद्यापही त्यांनी गुडन्यूज दिलेली नाहीय. अभिनेता राम चरण आणि उपासना कामिनेनी गेल्या 10 वर्षांपासून आनंदी वैवाहिक जीवन जगत आहेत. परंतु तरीही त्या दोघांनाही अजून गोड बातमी देण्याची घाई नाहीय.अशा परिस्थितीत त्यांच्या चाहत्यांना जाणून घ्यायचं आहे की यामागे नेमकं काय कारण असू शकतं. नुकतंच समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, या दोघांनी स्पष्ट केलं आहे की त्यांना अजूनही फॅमिली प्लॅनिंगमध्ये तितका रस नाही.दरम्यान रामचरणची पत्नी उपासनाने सद्गुरुंसोबत केलेल्या एका संभाषणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.सध्या हे दोघेही प्रचंड चर्चेत आहेत.
सद्गुरूंसोबतच्या संभाषणात रामचरणची पत्नी उपासनाने म्हटलं, ''मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे आणि माझे माझ्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. यानंतर ती 3 RRR बद्दल बोलते. ती म्हणते, “ माझ्यासाठी RRR चा अर्थ रिलेशन,रिप्रॉडक्शन आणि लाईफमधील रुल असा आहे. माझ्यासारख्या अनेक महिला आहेत ज्यांना याचं उत्तर हवं आहे. त्यानंतर लगेचच उपासनाने उघड करत सांगितलं की लोकसंख्या नियंत्रणामुळे तिला मूल नको आहे. (हे वाचा:'कॉलेजमध्ये एन्ट्री करताच शॉर्ट स्कर्टमध्ये काही मुली.....', आर माधवनने सांगितला त्यादिवशीचा भन्नाट किस्सा ) उपासनाच्या विषयावर उत्तर देताना सद्गुरु म्हणतात, 'तुम्ही असं आयुष्य जगायचं ठरवलं आणि पुनरुत्पादन (मुल) केलं नाही तर मी तुम्हाला पुरस्कार देऊ इच्छितो. मी पूर्वीही सर्व तरुण स्त्रियांना पुरस्कार जाहीर केले आहेत ज्या निरोगी आहेत, प्रजनन करू शकतात, तरीही त्यांनी न करण्याचा मार्ग निवडला आहे. ही सर्वात मोठी सेवा आहे जी तुम्ही सध्या करू शकता. मानव ही लुप्तप्राय प्रजाती नाही. आपली लोकसंख्या अजूनही खूप आहे. येत्या 3० ते 35 वर्षात आपण 10 अब्जच्या दिशेने वाटचाल करत आहोत.
First published:

Tags: Entertainment, South film, South indian actor

पुढील बातम्या