Home /News /entertainment /

सलमान खानच्या घरातून दररोज मिळतो रामचरणला जेवणाचा डब्बा; काय आहे कारण?

सलमान खानच्या घरातून दररोज मिळतो रामचरणला जेवणाचा डब्बा; काय आहे कारण?

अभिनेता रामचरणने नुकताच एका मुलाखती दरम्यान आपलं सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाशी किती जवळचं नातं आहे याचा खुलासा केला आहे.

    मुंबई, 7 जानेवारी-   आपल्याला असे अनेक साऊथ कलाकार   (South Actors)  पाहायला मिळतात, ज्यांनी आपल्या खास अंदाजाने प्रेक्षकांच्या मनात विशिष्ट स्थान निर्माण केलं आहे. त्यातीलच एक अभिनेता म्हणजे रामचरण   (Ram Charan)  होय. रामचरणचा मोठा चाहतावर्ग आहे. तो प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी यांचा मुलगा आहे. परंतु त्याने मनोरंजनसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. रामचरणला फक्त साऊथमध्येच नव्हे तर संपूर्ण देशात पसंती मिळते. सध्या तो आपल्या RRR   (RRR Movie)  या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आला होता. चित्रपटाच्या प्रदर्शनची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. तत्पूर्वी त्याची बॉलिवूड कलाकारांची झालेली जवळीक चर्चेत आली आहे. नुकताच रामचरणने एका मुलाखतीत एक अशी गोष्ट सांगितली आहे, ते ऐकून सर्वांच्याच भुवय्या उंचावल्या आहेत. रामचरणने सांगितलेली ही गोष्ट बॉलिवूडचा दबंग सलमान खान   (Salman Khan)  यांच्याशी संबंधित आहे. वाटलं ना आश्चर्य? हो हे खरं आहे. अभिनेता रामचरणने नुकताच एका मुलाखती दरम्यान आपलं सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाशी किती जवळचं नातं आहे याचा खुलासा केला आहे. इतकंच नव्हे तर महत्वाची गोष्ट म्हणजे रामचरण जेव्हा-जेव्हा मुंबईत असतो, त्याला सलमानच्या घरातून जेवणाचा डब्बा येतो. या मुलाखतीत बोलताना रामचरणने सांगितलं की, सलमान खान आणि माझं नातं खूपच छान आहे. आम्ही एकेमकांच्या फारच जवळ आहोत. माझ्या वडिलांनी त्यांच्यासोबत थम्स अपच्या जाहिरातीत काम केलं होतं. या दरम्यान माझी त्यांच्याशी भेट झाली होती'. तो पुढे म्हणाला, 'ही ओळख आता फारच घट्ट झाली आहे. मी नेहमीच कामानिमित्त मुंबईत येत असतो. मी माझ्या घरापासून दूर असतो. यावेळी मला सलमान खानच्या कुटुंबाकडून फारच प्रेम आणि आपुलकी मिळते. ते मला कधीच माझ्या कुटुंबाची उणीव भासू देत नाहीत. इतकंच नव्हे तर मी मुंबईत आल्यानंतर त्यांच्या घरी जेवण तर करतोच. शिवाय मुंबईत कोणत्याही ठिकाणी असताना मला त्यांच्या घरून जेवणाचा डब्बा पाठवला जातो' फक्त माझ्यासाठी नव्हे तर माझ्या संपूर्ण टीमसाठी ते जेवण पाठवतात. असं म्हणत रामचरणने सलमान आणि आपल्या नात्याचा खुलासा केला आहे. या दोघांना कधीही एकत्र न पाहिल्याने त्यांची इतकी घट्ट मैत्री पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. रामचरण हा साऊथमधील फारच प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याने २०१३ मध्ये 'जंजीर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात तो अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबत झळकला होता. परंतु हा चित्रपट फारसा कमाल दाखवू शकला नाही. त्यांनतर तो पुन्हा साऊथ चित्रपटांत सक्रिय झाला. लवकरच तो RRR या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाची प्रचंड चर्चा सुरु आहे. यामध्ये तो अजय देवगन, ज्युनिअर एनटीआर आणि आलिया भट्टसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Salman khan, South indian actor

    पुढील बातम्या