Home /News /entertainment /

RRR ने रिलीजपूर्वी कमावले होते इतके कोटी, सिनेमा थिएटरमध्ये येण्याआधीच कशी होते ही कोट्यवधींची कमाई?

RRR ने रिलीजपूर्वी कमावले होते इतके कोटी, सिनेमा थिएटरमध्ये येण्याआधीच कशी होते ही कोट्यवधींची कमाई?

SS Rajamouli RRR: आरआरआर या चित्रपटानं रिलीजआधीच जवळपास 750 कोटींची बंपर कमाई केली आहे. आता रिलीज होण्याआधीच एखादा चित्रपट इतकी कमाई कशी करू शकतो,असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? जाणून घ्या यामागे काय गणित असतं.

मुंबई, 26 मार्च: गेल्या काही वर्षांपासून असा ट्रेंड आला आहे की, बॉलिवूड सिनेमांसह दाक्षिणात्य चित्रपट नवनवे विक्रम करत आहेत. या चित्रपटांच्या कमाईचे अनेक रेकॉर्ड्स होतात. आता नुकत्याच आलेल्या आरआरआर (RRR movie) या सिनेमानेही कमाईचा नवा रेकॉर्ड केला आहे. एस. एस. राजमौली (SS Rajamouli RRR) यांच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी जगभरात 223 कोटी रुपयांचा बिझनेस (RRR Box Office Collection) केला आहे. फक्त भारतातच नाही तर अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, यूके आणि नॉर्थ अमेरिकेतही या चित्रपटानं खूप चांगला बिझनेस केला आहे, असं ट्रेड ॲनालिस्ट तरण आदर्श यांचं म्हणणं आहे. रिलीजपूर्वीही आरआरआर या चित्रपटानं चांगला व्यवसाय केल्याचं पिंकविलाच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. या अहवालानुसार, आरआरआर या चित्रपटानं रिलीजआधीच जवळपास 750 कोटींची बंपर कमाई केली आहे. आता रिलीज होण्याआधीच एखादा चित्रपट इतकी कमाई कशी करू शकतो,असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? जाणून घ्या यामागे काय गणित असतं. 1. ॲडव्हान्स बुकिंग एखादा चित्रपट थिएटर्समध्ये रिलीज होण्याआधी त्याचं ॲडव्हान्स बुकिंग (Advanced Booking of RRR) सुरू होतं. चित्रपटातली स्टारकास्ट आणि ट्रेलर या गोष्टींची यात खूप महत्त्वाची भूमिका असते. अनेक फॅन्स आपल्या आवडत्या कलाकाराच्या चित्रपटाची वाट पाहत असतात. त्यामुळे त्यांचा चित्रपट रिलीज होण्याआधीच ते बुकिंग करतात. तसंच चित्रपटाचा ट्रेलर उत्सुकता वाढवणारा असेल तर मग बुकिंगमध्ये नक्कीच फरक पडतो. या दोन्हीमुळे वातावरणनिर्मिती झाली तर त्याचा परिणाम ॲडव्हान्स बुकिंगवर दिसतो. हेही प्री-बिझनेस कलेक्शनच मानलं जातं. RRR या चित्रपटाच्या बाबतीतही असंच झालं आहे. हे वाचा-RRR Box Office Collection: पहिल्याच दिवशी RRR ने बॅटमॅनला पछाडलं, केली रेकॉर्डब्रेक कमाई 2. चित्रपटाचे राइट्स चित्रपटाचे राइट्स (Film Rights) विकले जातात. त्यातून तर कमाई होतेच; पण चित्रपटाच्या म्युझिकचे म्हणजे संगीताचेही राइट्स (हक्क) (Music Rights) विकले जातात. म्हणजेच त्या चित्रपटाचं संगीत दाखवण्यासाठी किंवा ऐकवण्यासाठीसुद्धा म्युझिक कंपन्यांना मोठी किंमत द्यावी लागते. इतकंच नाही, तर रिलीज झाल्यानंतर एका ठरावीक काळानंतर तो चित्रपट टीव्ही किंवा ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर दाखविण्यात येतो. त्यासाठीही चॅनेल्स (Channels) किंवा ओटीटी प्लॅटफॉर्म्सना (OTT Platforms) चित्रपटाचे राइट्स विकत घ्यावे लागतात. तुम्ही पाहिलं असेल, की एखादा चित्रपट टीव्हीवर दाखवण्याआधी त्याची जाहिरात ‘वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर’ अशी केली जाते. जेव्हा त्या चॅनेलनं त्या चित्रपटाचे हक्क विकत घेतलेले असतात, तेव्हाच अशी जाहिरात केली जाते. चित्रपटांचे हक्क हेही कमाईचं चांगलं माध्यम आहे. 3. डिस्ट्रिब्युटर्सकडून मिळणारी किंमत चित्रपट तयार करणारे प्रोड्युसर्स चित्रपट सिनेमागृहांपर्यंत पोहोचविण्यासाठी डिस्ट्रिब्युटर्स म्हणजे वितरकांची मदत घेतात. प्रोड्युसर्स डिस्ट्रिब्युटर्सना एका मोठ्या किमतीला चित्रपटाचे हक्क विकतात. हे वितरक थिएटर्सपर्यंत हे चित्रपट पोहोचवतात आणि नफा कमावतात. यामध्ये चित्रपटाची स्टारकास्ट आणि चित्रपटामुळे झालेली वातावरणनिर्मिती आणि त्याची झालेली प्रसिद्धी या गोष्टी महत्त्वाची भूमिका बजावतात. हे जितकं जास्त तितकं एखाद्या चित्रपटाचे हक्क विकत घेण्यासाठी वितरकांमध्ये चढाओढ सुरू होते. याचाच फायदा प्रोड्युर्सना मिळतो आणि रिलीजआधीच चित्रपटाची कमाई चांगली होते. हे वाचा-RRR: ज्यु. NTR च्या एन्ट्रीवर चाहत्यांनी केलं असं काही की सर्वच झाले थक्क, पाहा VIDEO 4. कंपन्यांचे प्रमोशन अनेक कंपन्या प्रसिद्धी आणि प्रमोशनसाठी प्रोड्युसर्ससोबत एक डील करतात. या डीलअंतर्गत त्यांच्या कंपन्यांची नावं, लोगो किंवा प्रॉडक्ट्स चित्रपटांमध्ये दाखविली जातात. आपण अनेकदा एखाद्या चित्रपटात मोठ्या कंपनीची शोरूम बघतो किंवा अन्य काही गोष्टी बघतो. या सीनसाठी प्रोड्युसर कोट्यवधी रुपये घेतात. त्यामुळे चित्रपटाच्या मोठ्या कमाईचा भाग या प्रायोजकत्वातूनही येतो. काळ बदलला तसे चित्रपटही बदलले. थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणारे प्रेक्षक असले तरी ती संख्या आता ओटीटी आणि अन्य माध्यमांमुळे कमी होत आहे. त्यामुळेच प्रोड्युर्स फक्त थिएटर्सवर चित्रपटाच्या कमाईवर अवलंबून राहत नाहीत. उलट रिलीजआधीच चित्रपट त्यातले कलाकार, संगीत, प्रसिद्धी यामुळे भरपूर पैसे कमावू शकतो.
First published:

Tags: Entertainment, South film, South indian actor

पुढील बातम्या