Home /News /entertainment /

RRR नंतर Alia Bhatt च्या हाताला लागला NTR चा आणखी एक चित्रपट; Acharya चे डायरेक्टर करणार दिग्दर्शन!

RRR नंतर Alia Bhatt च्या हाताला लागला NTR चा आणखी एक चित्रपट; Acharya चे डायरेक्टर करणार दिग्दर्शन!

आलिया भट्ट (Alia Bhatt) बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहे. आता मात्र तिची जादू दाक्षिणात्या चित्रपट क्षेत्रात देखील पाहायला मिळत आहे.

    मुंबई, 17 जानेवारी- आलिया भट्ट (Alia Bhatt) बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहे. आता मात्र तिची जादू दाक्षिणात्या चित्रपट क्षेत्रात देखील पाहायला मिळत आहे. एस. एस. राजामौली यांच्या RRR सिनेमाता काम केल्यानंतर आलियाला(Alia Bhatt movie) आणखी एक दाक्षिणात्य सिनेमा मिळाला आहे. आचार्यचे दिग्दर्शक कोराताल शिवा यांच्या (Director Koratala siva) आगामी सिनेमासाठी आलिया भट्टचे नाव चर्चेत आहे. याविषयी कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र या सिनेमात ती सुपरस्टार जुनियर एनटीआर (Jr NTR) याच्यासोबत दिसणार असल्याची चर्चा आहे NTR च्या सिनेमात आलिया दिसण्याची शक्यता सोशल मीडियावर देखील जुनियर एनटीआर #NTR30 देखील ट्रेडिंगमध्ये आहे. आलिया भट्ट या सिनेमाच हिस्सा असल्याचा अंदाज चाहत्यांकडून व्यक्त केला जात आहे. कोरोताल शिवा यांच्या दिग्दर्शनाखाल बनत आगामी सिनेमाला अनिरुद्ध रविंचदर (Anirudh Ravichander) यांचे संगीत असणार आहे. याच सिनेमाच भाग आलिया भट्ट असण्याची शक्यता आहे. सिनेमाच्या जवळच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमाच्या प्री-प्रोडक्शनसोबत पॅन इंडियाच्या सिनेमासाठी आलिय भट्ट आणि संगीतकरार यांच्यासोबत बोलणी सुरू आहे. NTR30 मध्ये अभिनेता एका विद्यार्थी संघटनेच्या नेत्याची (student union leader) भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. असं जरी असले तरी निर्मात्यांकडून या सिनेमाच्या संपूर्ण कथेविषयी माहिती मिळेलच पण तोपर्यंत काही काळ वाट पाहावी लागणार आहे. वाचा-Vijay Deverakonda ने जगातील सर्वात 'या' श्रीमंत व्यक्तीला दिलं निमंत्रण मार्चमध्ये सुरू होणार आहे NTR30 ची शुटिंग NTR30 सिनेमा पुढच्या महिन्यात अधिकृत पणे लॉंच करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आबे. चाहत्यांनी जुनियर एनटीआरला टॅग करत त्यांना याबद्दल माहिती विचारली आहे. रिपोर्टनुसार, जर कोरोनाचा कहर कम झाला तर सिनेमाचे शुंटिग मार्चमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या जुनिअर एनटीआर आणि आलिया त्यांच्या 400 कोटीच्या बिग बजेट आरआरआर या सिनेमाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे. या सिनेमात राम चरण देखील मुख्य भूमिकेत आहे. पहिल्यांदा हा सिनेमा संक्राती दिवशी रिलीज होणार होता मात्र कोरोनाचा वाढता प्रसार पाहता सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याची माहिती निर्मात्यांनी दिली होती.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Alia Bhatt, Bollywood News, Entertainment, Tollywood

    पुढील बातम्या