'रोजा'मधली मधू बनलीय देवसेनेची आई

'रोजा'मधली मधू बनलीय देवसेनेची आई

दिल है छोटासा म्हणत लोकांची मनं जिंकणारी रोजा अर्थात मधु लवकरच छोट्या पडद्यावर कमबॅक करतेय.आरंभ या मालिकेमध्ये ती देवसेनेच्या आईच्या भूमिकेत दिसणारे.

  • Share this:

15 जून : दिल है छोटासा म्हणत लोकांची मनं जिंकणारी  रोजा अर्थात मधु लवकरच छोट्या पडद्यावर कमबॅक करतेय.आरंभ या  मालिकेमध्ये ती देवसेनेच्या आईच्या भूमिकेत दिसणारे.

'फुल और कांटे' या सिनेमातून रूपेरी पडद्यावर तिनं धडक मारली होती . रोजामध्ये तिनं वठवलेल्या निरागस मुलीच्या भूमिकेमुळे ती घरोघरी पोचली .त्यानंतर 2004 साली तिनं देवी नावाच्या मालिकेत काम केलं होतं .त्यानंतर तब्बल 13 वर्षांनी ती पुन्हा परततेय.

आरंभमध्ये ती देवसेनेच्या आईची भूमिका करणार आहे . ही भूमिका बाहुबलीतल्या शिवगामीसारखी आहे .आरंभचं कथानक  बाहुबलीचे लेखक के. विजयेन्द्रच लिहीत आहेत.

First published: June 15, 2017, 8:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading