ब्रिटनच्या शाही घराण्यात आला नवा राजपुत्र

मेगन 18 मार्चपासून मॅटरनिटी लिव्हवर होती. यामुळे एप्रिल महिन्याच्या शेवटाला मुलाचा जन्म होईल असे म्हटले जात होते.

News18 Lokmat | Updated On: May 6, 2019 09:02 PM IST

ब्रिटनच्या शाही घराण्यात आला नवा राजपुत्र

ब्रिटनच्या शाही घराण्यात सोमवारी नव्या पाहुण्याचं आगमन झालं. प्रिन्स हॅरी आणि त्याची पत्नी डचेस ऑफ ससेक्स मेगन मार्केलने मुलाला जन्म दिला. मुल आणि बाळ पूर्णपणे स्वस्थ आहेत. शाही कुटुंबानेही या बातमीला दुजोरा दिला असून इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत म्हटलं की, आम्हाला हे सांगताना फार आनंद होत आहे की, 6 मे 2019 च्या सकाळी ड्यूक आणि डचेज ऑफ ससेक्स यांच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला आहे. आई आणि मुल दोघांची तब्येत चांगली आहे. हे शाही जोडपं या आनंदाच्या दिवशी त्यांच्या पाठिशी उभे राहिल्याबद्दल देशवासियांचे आभारही मानत आहेत.

निवडणुकांचा परिणाम आता KBC वरही, विचारला ‘सर्जिकल स्ट्राइक’वर प्रश्न




Loading...

 





View this post on Instagram




 

We are pleased to announce that Their Royal Highnesses The Duke and Duchess of Sussex welcomed their firstborn child in the early morning on May 6th, 2019. Their Royal Highnesses’ son weighs 7lbs. 3oz. The Duchess and baby are both healthy and well, and the couple thank members of the public for their shared excitement and support during this very special time in their lives. More details will be shared in the forthcoming days.


A post shared by The Duke and Duchess of Sussex (@sussexroyal) on





जर मी भगवी साडी नेसले तर मी ‘साध्वी स्वरा भास्कर’ होईन का?

मीडिया रिपोर्टनुसार मेगनला सकाळपासूनच प्रसुती वेदना जाणवत होत्या. त्यामुळेच तिला तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले होते. यावेळी तिच्यासोबत पती प्रिन्स हॅरीही होता. मेगन 18 मार्चपासून मॅटरनिटी लिव्हवर होती. यामुळे एप्रिल महिन्याच्या शेवटाला मुलाचा जन्म होईल असे म्हटले जात होते. गेल्या वर्षी 19 मे रोजी प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्केल यांचं लग्न झालं होतं.

VIDEO: उर्मिलानंतर राजकारणात एण्ट्री करणार? प्रिया बापट म्हणते...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 6, 2019 09:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...