प्रेमाची गोष्ट सांगण्यासाठी आलाय मराठीतला रोमँटीक सिनेमा 'प्रेमाची रॉमकॉम'

मराठीत सध्या रोमँटीक सिनेमांची लाट आली आहे. याच लाटेवर स्वार होण्यासाठी 'प्रेमाची रॉमकॉम' हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणारे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Apr 8, 2018 09:53 AM IST

प्रेमाची गोष्ट सांगण्यासाठी आलाय मराठीतला रोमँटीक सिनेमा 'प्रेमाची रॉमकॉम'

08 एप्रिल : मराठीत सध्या रोमँटीक सिनेमांची लाट आली आहे. याच लाटेवर स्वार होण्यासाठी 'प्रेमाची रॉमकॉम' हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणारे. या सिनेमाचा मुहूर्त अभिनेते मिलिंद गवळी आणि किशोर कदम यांच्याहस्ते नुकताच करण्यात आला.

सिनेमातून सारंग दोषी आणि मधुरा वैद्य ही नवोदीत जोडी पदार्पण करतेय. या सिनेमाचं दिग्दर्शन गोरख जोखदंडे हे करणार असून सचिन शिंदे यांनी ड्रीम लाँचर एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती केलीय.

सिनेसृष्टीत प्रेम ही संकल्पना अजरामर आहे. आजवर याच संकल्पनेवरचे कितीही सिनेमे आले असले तरी प्रत्येक सिनेमातून प्रेमाकडे वेगळ्या दृष्टीनं पाहिलं जातं. आता रॉमकॉम हा सिनेमाही प्रेमाचा वेगळ्या पद्धतीनं शोध घेणार आहे.

रॉमकॉम या सिनेमात राहुल आणि सुमन यांची प्रेमकहाणी पहायला मिळणार आहे. 'रॉमकॉम'या सिनेमाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या बावनकशी अभिनयाने सिनेमांना वेगळी उंची प्राप्त करून देणारे अभिनेते किशोर कदम आणि सैराटतसेच सध्या न्यूडमधल्या भूमिकेमुळे चर्चेत असलेल्या अभिनयसंपन्न छाया कदम या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 8, 2018 09:53 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close