सिंबा आणि सिंघम येणार एकत्र, रोहितचं 'असं' आहे प्लॅनिंग

सिंबा आणि सिंघम येणार एकत्र, रोहितचं 'असं' आहे प्लॅनिंग

सिंबाच्या प्रमोशन दरम्यान दिग्दर्शक रोहित शेट्टीनं एक गुपित उलगडलं आहे. ते म्हणाला, मला असा एक सिनेमा बनवायचाय, ज्यात सिंघम आणि सिंबा एकत्र असतील.

  • Share this:

मुंबई, 19 डिसेंबर : रणवीर सिंगच्या सिंबाचं ट्रेलर लाँच झालं. तेव्हा हा सिनेमा सिंघमसारखाच आहे, अशी कुजबुज सुरू झाली. ट्रेलर बघून अजय देवगणचीच आठवण येत होती.


सिंबाच्या प्रमोशन दरम्यान दिग्दर्शक रोहित शेट्टीनं एक गुपित उलगडलं आहे. ते म्हणाला, मला असा एक सिनेमा बनवायचाय, ज्यात सिंघम आणि सिंबा एकत्र असतील. आतापर्यंतच्या हिंदी सिनेमात असं झालेलं नाही. पण आता ते करण्याचा माझा प्रयत्न आहे.'


रोहित म्हणाला, 'प्रेक्षकांना सिंघम आवडलाय. त्या दोन व्यक्तिरेखांना एकत्र आणलं तर धमाका होईल.' रोहित सिंबा 2वरही काम सुरू करणार आहे.


सिंबानंतर रोहित शेट्टी दुसऱ्या एका सिनेमात बिझी असणारेय. तो सिनेमा करणार आहे अक्षय कुमारसोबत. सूत्रांच्या माहितीनुसार हा सिनेमा एकदम मसाला फिल्म असणार. यात जबरदस्त अॅक्शन्स आहेत. कदाचित अक्षय कुमार या सिनेमाची निर्मितीही करणार आहे.


असं समजतंय, अक्षयनं या सिनेमाच्या डेट्स लाॅकही केल्यात. पुढच्या वर्षी सिनेमाचं शूटिंग सुरू होईल. दरम्यात अक्षय त्याच्या केसरी सिनेमाचं प्रमोशनही करणारेय.


याशिवाय अक्षयला एक नवा मोठा सिनेमा मिळालाय. दिग्दर्शक शंकरनं आपल्या सिनेमात अक्षयला काम करण्यासाठी मनवलंय. बातमी अशी आहे की, त्या सिनेमात सुरुवातीला अजय देवगणला नक्की केलं होतं. पण आता शंकरनं अजयला काढून अक्षयला घेतलंय.


हा सिनेमा आहे तरी कुठला? शंकरचा पुढचा सिनेमा आहे 'इंडियन 2'. सिनेमात अक्षय कुमार आणि कमल हासन असतील. पहिल्यांदाच हे दोघं एकत्र असणार आहेत. अजून या सिनेमाची अधिकृत घोषणा केली गेली नाहीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 19, 2018 03:05 PM IST

ताज्या बातम्या