रोहित शेट्टीने घेतली नवी कोरी मस्सेराटी!

आपल्या सिनेमांमध्ये कायम मोठमोठ्या गाड्या फुटबॉलसारख्या हवेत उडवणारा दिग्दर्शक रोहित शेट्टी खऱ्या आयुष्यात मात्र गाड्यांचा तेवढाच मोठा शौकीन आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 29, 2018 09:47 AM IST

रोहित शेट्टीने घेतली नवी कोरी मस्सेराटी!

29 जानेवारी : आपल्या सिनेमांमध्ये कायम मोठमोठ्या गाड्या फुटबॉलसारख्या हवेत उडवणारा दिग्दर्शक रोहित शेट्टी खऱ्या आयुष्यात मात्र गाड्यांचा तेवढाच मोठा शौकीन आहे. रोहितनं नुकतीच मस्सेराटी ग्रँण्ड टुरिस्मो स्पोर्ट ही गाडी खरेदी केली आहे. या गाडीची किंमत १ कोटी ७२ लाख रूपये एवढी आहे. रोहितनं या गाडीत खास त्याच्या आवडीनुसार एका इटालियन डिझायनरकडून काही गोष्टी बदलून घेतल्यात.

या गाडीत ४ माणसं बसू शकतील. गोलमाल अगेन हा सिनेमा हिट झाल्यानंतर रोहितनं ही गाडी स्वतःलाच गिफ्ट केली आहे असंच म्हणावं लागेल.

या गाडीचं खास वैशिष्ट्ये म्हणजे यात 4.7 लीटर व्ही8 इंजिन लावण्यात आलं आहे. इंजिन 453 बीएचपीची पॉवर आणि 520 एनएमची टॉर्क देते. या इंजिनसोबत 6-स्पीड ZF ऑटोमॅटिक गियरबॉक्स लावण्यात आले आहेत. 4.7 सेकंदात ही गाडी 100 किलोमीटर प्रति तास इतकी धावते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 29, 2018 09:47 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...