हा चित्रपट विनोदी असेल. लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या मोकळ्या वेळात रोहित शेट्टीने स्क्रिप्टवर काम केलं आहे. शेट्टीने रणवीर सिंगसोबत या चित्रपटाची कल्पना शेअर केली तेव्हापासून रणवीर सिंगदेखील या या चित्रपटासाठी खूप उत्साही आहे. मीडिया रिपोर्टनुसार रणवीर सिंग या चित्रपटात प्रथमच डबल रोल साकारणार आहे. रणवीर सिंग व्यतिरिक्त वरुण शर्मा, पूजा हेगडे आणि जॅकलिन फर्नांडिससुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत असतील. सर्कस चित्रपटाचं काम पूर्ण झाल्यानंतर तो वेब सीरिजच्या तयारीला लागणार आहे. आता या नव्या चॅलेंजमध्ये तो किती यशस्वी होतो हे येणाऱ्या काळात समजेलच.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Rohit Shetty