'सिंबा' सिनेमातील रेप सीनच्या वादावर रोहित शेट्टीनं केली टीकाकारांची बोलती बंद

'सिंबा' सिनेमातील रेप सीनच्या वादावर रोहित शेट्टीनं केली टीकाकारांची बोलती बंद

सिंबा चित्रपट विकण्यासाठी रेप सीनची भर टाकण्यात आल्याची टीका सोशल मीडियावर केली जातं आहे. परंतु आता यावर रोहित शेट्टीनं उत्तर देऊन सर्व टीकाकारांची बोलती बंद केली आहे.

  • Share this:

मुंबई, 06 जानेवारी : नुकताच रणवीर सिंग आणि सारा अली खानचा 'सिंबा' चित्रपट रिलीज झाला. चित्रपटाचं प्रोमोशन दमदार केल्यानं सध्या चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. रणवीरच्या पोलिसाच्या भूमिकेला प्रेक्षक फारच पसंती देत आहेत. चित्रपटानं आत्तापर्यंत 150 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. 100 कोटींपेक्षा जास्त कमाई करणारा रोहित शेट्टीचा 'सिंबा' आठवा सिनेमा आहे.

सध्या चर्चेत असलेल्या सिंबा चित्रपटावर काही लोकांनी टीका केली आहे. सोशल मीडियावरसुद्धा चित्रपटातील रेप सीनचा मुद्दा धारेवर धरला आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीनं चित्रपट विकण्यासाठी यामध्ये रेप सीनची भर टाकली आहे. असं टीकाकारांचं म्हणणं आहे. पण आता यावर रोहित शेट्टीनं आपलं मौन सोडलं असून आणि टीका कारणाऱ्यांची बोलती बंद केली आहे.

'बलात्काराच्या मुद्यावर झालेला 'सिंबा' काही पहिला चित्रपट नाही आणि माझं करिअर या टप्प्यावर आलं नाही की मला चित्रपट विकण्यासाठी अशा गोष्टींचा आधार घ्यावा लागेल. चित्रपटातील कोणताही सीन कट न करता सेंसॉर बोर्डनं परवानगी दिली आहे. तसेच हा चित्रपट मी माझ्या विचारांनुसार बनवला आहे' असं उत्तर रोहित शेट्टीनं दिलं.


सिंबा सिनेमा हा साऊथचा सुपरहिट चित्रपट 'टेंपर' चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात एका अशा पोलिसाची लव्ह स्टोरी सांगण्यात आली आहे. जो कोणतेही काम करण्यासाठी सगळ्या प्रकारचा वापर करतो. सिंबा चित्रपटाच्या ट्रेलरवरून खरतर हे स्पष्ट होत की, चित्रपटात रणवीर सिंग एक लाच खाऊ पोलिसाच्या भूमिकेत आहे. त्याच्या आयुष्यात असा प्रसंग घडतो की, त्यानंतर तो पूर्णपणे बदलतो आणि अन्यायाविरोधात आवाज उठवू लागतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 6, 2019 11:08 AM IST

ताज्या बातम्या