मुंबई 29 मे: बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी हे पाळीव प्राण्यांचे चाहते आहेत. (bollywood celebrities) आपल्या घरी ते कुत्रा, मांजर, किंवा पक्षी वगैरे सर्रास पाळताना दिसतात. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ देखील ते सोशल मीडियावर शेअर करतात. शिवाय सकाळ संध्याकाळी ते आपल्या प्राण्यांना घेऊन रस्त्यावर फेरफटका देखील मारायला येतात. या सेलिब्रिटींच्या प्राणी प्रेमाचं भरपूर कौतुक केलं जातं. (Dog Lover celebrities) मात्र प्राणी पाळणाऱ्या या सेलिब्रिटींवर अभिनेता रोहित रॉय संतापला आहे. (Rohit Roy) त्यानं सोशल मीडियाद्वारे आपला संताप व्यक्त केला आहे.
All our dear celebs seeing ‘walking their pets’ look sooooo cool n classy in their perfect ‘walk the pet’ attire... never seen any of them carrying a plastic bag though wonder who picks up the shit once their babies are done?!?
— Rohit Bose Roy (@rohitroy500) May 28, 2021
ACP दिव्याचा सिंघम अवतार; भर लग्नात ‘देवमाणसाला’ दिला बेदम चोप
“आपले सगळे आवडते सेलिब्रिटी त्यांच्या पाळीव प्राण्यांना फिरायला घेऊन जाताना दिसतं आहेत. त्यांचे अतिशय कूल आणि क्लासिक लूकमधले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यांच्यापैकी कोणाच्या ही हातात मला कधी प्लास्टिकची पिशवी दिसत नाही. मला आश्चर्य वाटतं की त्यांच्या पाळीव प्राण्यांनी केलेली ही घाण कोण उचलतं?,” असा रोखठोक सवाल त्यानं या प्राणी मित्र सेलिब्रिटींना केला आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
अभिनेत्रीचा माजी मंत्र्यावर लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांना महत्त्वाचा पुरावाही दिला
Puraani aadat hai logon ki , to leave behind a mess for others to clean up.
— Ronit Bose Roy (@RonitBoseRoy) May 28, 2021
रोहितच्या या ट्विटवर त्याचा मोठा भाऊ अभिनेता रॉनित रॉय यानं उत्तर दिलं आहे. “ही या लोकांची जुनी सवय आहे. यांनी केलेली घाण दुसऱ्यांना स्वच्छ करावी लागते.” त्याच्या या उत्तराला अनेक नेटकऱ्यांनी समर्थन दिलं आहे. दरम्यान रोहित आणि रॉनित हे दोघंही सोशल मीडियावर सक्रिय असतात. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ते रोखठोक प्रतिक्रिया देतात. वेळप्रसंगी त्यांनी नामांकित सेलिब्रिटींनाही सवाल केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actor, Bollywood actress, Dog, Entertainment