Home /News /entertainment /

जुईलीच्या हातावर चढला रोहितच्या प्रेमाचा रंग!मेहंदीचा झक्कास VIDEO VIRAL

जुईलीच्या हातावर चढला रोहितच्या प्रेमाचा रंग!मेहंदीचा झक्कास VIDEO VIRAL

मराठी चित्रपट सृष्टीतील गोंडस कपल रोहित (Rohit Raut) आणि जुईली (Juilee Jogalekar) उद्या लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत.

  मुंबई, 22 जानेवारी-   मराठी चित्रपट सृष्टीतील गोंडस कपल रोहित   (Rohit Raut)  आणि जुईली   (Juilee Jogalekar)  उद्या लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. तत्पूर्वी त्यांच्या लग्नाआधीचे कार्यक्रम पार पडत आहेत. हळदीनंतर आता मेहंदीचा झक्कास व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ते आपल्या कुटुंब आणि मित्र मैत्रिनींसोबत मज्जामस्ती करताना दिसून येत आहेत. मनोरंजनसृष्टीत सध्या लग्नसराई सुरु आहे. एकापाठोपाठ एक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. या यादीमध्ये आता जुईली आणि रोहितचा समावेश होणार आहे. दोघेही आपल्या हळदी पासून मेहंदीपर्यंत सर्व कार्यक्रमांचा आनंद घेत आहेत. नुकताच जुईली आणि रोहितच्या हळदीचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले होते. त्यांनतर आता या दोघांच्या मेहंदी कार्यक्रमाचे व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये दोघेही फारच उत्साही दिसत आहेत. राजश्री मराठीने आपल्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. जुईली आणि रोहितच्या मेहंदी कार्यक्रमातील व्हिडीओमध्ये फक्त आणि फक्त धम्माल सुरु आहे. या व्हिडीओमध्ये रोहित आणि जुईली आपल्या मित्रांसोबत धम्माल डान्स करताना दिसून येत आहेत. इतकंच नव्हे तर त्यांचा मित्र आणि इंडियन आयडॉल १२ चा स्पर्धक नचिकेत लेलेसुद्धा या व्हिडीओमध्ये जबरदस्त डान्स करताना दिसून येत आहे. नचिकेत त्यांचा जुना मित्र आहे. तो त्यांच्या प्रत्येक क्षणात सहभागी असतो. लग्नाच्या सर्व कार्यक्रमातही तो उत्साहाने सहभाग घेत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
  जुईली आणि रोहित गेली अनेक वर्षे एकेमकांना डेट करत आहेत. त्यांची जोडी चाहत्यांना फारच पसंत आहे. त्यांनी आपलं नातं खूप आधी ऑफिशियल केलं आहे.ते दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. इतकंच नव्हे तर सतत ते एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करून आपलं प्रेम व्यक्त करत असतात. त्यांच्या प्रत्येक पोस्ट त्यांच्या चाहत्यांना फारच पसंत पडतात. काह दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या केळवणाचे फोटो शेअर केले होते. मनोरंजन सृष्टीतील त्यांच्या एका जवळच्या मैत्रिणीने त्यांना केळवण दिलं होतं.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Marathi entertainment

  पुढील बातम्या