आपण यांना ओळखलंत का? Rohini Hattangadi | Once More |

आपण यांना ओळखलंत का? Rohini Hattangadi | Once More |

Rohini Hattangadi | Once More | सेलिब्रेटींना सगळेच ओळखतात...पण तरीही यांना तुम्ही ओळखलं नसेल!

  • Share this:

मुंबई, 27 जून- ‘Once मोअर’ चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शक नरेश बिडकरांचाही स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्यांचं एक विचित्र स्वप्न साकार होत होतं. ‘Once मोअर’ चित्रपटात एक विचित्र व्यक्तिरेखा आहे. एका स्त्रीला पुरुषाची व्यक्तिरेखा साकारायची होती. आता तुम्ही म्हणाल की यात काय नाविण्य. आतापर्यंत अनेकांनी हा प्रयोग केला आहे. पण सिनेमातील एका प्रसंगासाठी पुरुषाची व्यक्तिरेखा साकारायची नसून संपूर्ण सिनेमात एका अभिनेत्रीला पुरुष म्हणून वावरायचं होतं. हे आव्हान होतं आणि हे आव्हान पेलण्यासाठी कसदार अभिनेत्री हवी होती. मग काय या भूमिकेसाठी ‘Once मोअर’ च्या टीमने शोध मोहीम सुरू केली. अखेर त्यांना रोहिणी हट्टंगडी यांच्या रुपात ती अभिनेत्री सापडली. या फोटोत दिसणारे आजोबा म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आहेत.

जनरल सॅम मानेकशॉ, ज्यांच्या सात गोळ्याही काहीच बिघडवू शकल्या नाहीत!

‘Once मोअर’ हा सिनेमा येत्या १ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. या आगामी मराठी चित्रपटासाठी रोहिणीताईंनी हे आजोबांचं पुरुषी रूप धारण केलं आहे. या भूमिकेसाठी रोहिणीताईंनी किती मेहनत घेतली असेल याचा अंदाज फोटोतील गेटअपवरून सहज येतो. ‘Once मोअर’ चित्रपटाच्या कथानकाची गरज म्हणून एकाचवेळी स्त्री व पुरुष अशी दुहेरी भूमिका साकारू शकेल अशा सशक्त अभिनेत्रीची गरज होती. या भूमिकेला रोहिणी न्याय देऊ शकतील हा विचार करून दिग्दर्शक नरेश बीडकर यांनी रोहिणी हट्टंगडी यांना भूमिकेसाठी विचारणा केली. भूमिकेचं आव्हान आणि त्यातील वेगळेपणा लक्षात घेत रोहिणीताईंनी या भूमिकेला होकार दिला.

‘देशासाठी लढा.. जिंकण्यासाठीच लढा..’ सॅम मानेकशॉ यांचे हे 5 कोट एकदा वाचाच!

कमल हसन यांचा बऱ्याच सिनेमांत गेटअप करणारे बॉलिवूडचे प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट रमेश मोहंती, कमलेश आणि श्रीनिवास मेनगु यांनी ‘Once मोअर’ या चित्रपटासाठी रोहिणीताईंचा मेकअप केला आहे. रमेश आणि कमलेश यांनी प्रॉस्थेटिक मेकअपच्या सहाय्याने रोहिणी यांना आजोबांचं रूप दिलं आहे. या मेकअपसाठी रमेश आणि कमलेश यांच्यासोबतच रोहिणींनीही खूप मेहनत घेतली आहे. चित्रीकरणाच्या पाच तास आधी रोहिणीताईंना मेकअप करायला बसावे लागायचे आणि दिवसभराचं चित्रीकरण पूर्ण झाल्यावर दोन तास मेकअप काढण्यासाठी लागायचा. या काळात त्या काहीही खाऊ शकत नव्हत्या.

बाहुबलीच्या 'देवसेने'चा झाला अपघात, थोडक्यात बचावला पाय

आजोबांच्या गेटअपमध्ये रोहिणीताईंना केवळ अभिनय, संवादफेक करायची नव्हती, तर त्यात धावण्यापासून अॅक्शन सीन्सपर्यंत बऱ्याच गोष्टींचा समावेश होता. त्यामुळे या वयात रोहिणीताईंनी स्वीकारलेलं आजोबांच्या भूमिकेचं आव्हान आणि त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत नक्कीच कौतुकास्पद आहे. आजवरच्या करियरमधील ही नावीण्यपूर्ण आणि आव्हानात्मक भूमिका साकारण्याची संधी ‘Once मोअर’ या सिनेमामुळे मिळाल्याचं सांगत रोहिणी हट्टंगडी म्हणाल्या की, ‘मला नेहमीच आव्हानं स्वीकारायला आवडतात. हे आव्हान मी स्वीकारणं धाडसाचं होतं पण यातही एक आनंद होता. त्यामुळेच पाच तासांची मेकअप प्रोसेस आणि गेटअपमध्ये अॅक्शन करणं हे देखील मी एन्जॅाय केलं. तसेच प्रेक्षकांनाही माझं हे रूप नक्कीच आवडेल’ अशी अपेक्षा रोहिणीताईंनी व्यक्त केली.

KGFस्टार यशने सांगितलं मुलीचं नाव, दोन दिवसांनी बायको म्हणाली मी पुन्हा प्रेग्नट

करोडपतीच्या सेटवर सयाजी शिंदेंनी केला सरप्राईज संदर्भातला खुलासा

First published: June 27, 2019, 5:24 PM IST

ताज्या बातम्या