Rocketry The Nambi Effect: रॉकेट वैज्ञानिकाचं आयुष्य मोठ्या पडद्यावर

Rocketry The Nambi Effect: रॉकेट वैज्ञानिकाचं आयुष्य मोठ्या पडद्यावर

ट्रेलर इंटरनेटवर प्रदर्शित झाला. त्याला प्रेक्षकांचा उंदड प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाविषयी लोकांची उत्सुकता वाढली असून, नंबी नारायण यांच्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

  • Share this:

मुंबई 5 एप्रिल: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसह बॉलीवूडमध्येही (Bollywood) आपला ठसा उमटवणाऱ्या आर. माधवननं (R. Madhavan) दिग्दर्शनात (Direction) पदार्पण केलं असून, त्याचा पहिला चित्रपट ‘रॉकेट्री : दी नंबी इफेक्ट’ (Rocketry : The Nambi Effect) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात आर. माधवन स्वतःच नंबी नारायण यांची भूमिका साकारत आहे. नुकताचा याचा ट्रेलर इंटरनेटवर प्रदर्शित झाला. त्याला प्रेक्षकांचा उंदड प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाविषयी लोकांची उत्सुकता वाढली असून, नंबी नारायण यांच्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

कोण आहेत नंबी नारायण?

2019 मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेले नंबी नारायण (Nambi Narayan) हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोमध्ये (ISRO) क्रायोजेनिक्स (Cryogenics) विभागाचे प्रमुख होते. त्यांच्यावर 1994च्या सुमारास हेरगिरीचा आरोप करण्यात आला. आपल्यावरील आरोप खोटे आहेत हे सिद्ध करण्यासाठी नंबी नारायण यांनी दीर्घकाळ लढा दिला. कालांतरानं त्यांच्यावरील आरोप खोटे असल्याचं सिद्ध झालं; पण तोपर्यंत त्यांचे करिअर उद्धवस्त झाले होते. नंबी नारायण यांच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट आहे.

अवश्य पाहा - सलमान खान होणार ‘मास्टर’; येतोय ‘या’ सुपरहिट तमिळ चित्रपटाचा रिमेक

तामिळनाडूतील नंबी नारायण यांची 1966 मध्ये इस्रोचे तत्कालीन अध्यक्ष विक्रम साराभाई (Vikarm Sarabhai) यांच्याशी भेट झाली. त्यावेळी नंबी नारायण रॉकेटसाठी पेलोड इंटिग्रेटर म्हणून काम करत होते. त्यांची गुणवत्ता साराभाई यांनी हेरली होती. त्यांच्या प्रोत्साहनानं नंबी यांनी तिरुवनंतपुरम इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये एम. टेकसाठी प्रवेश घेतला. पुढं विक्रम साराभाई यांच्या प्रयत्नांनी त्यांना नासामध्ये (NASA) फेलोशिप मिळाली. तिथं त्यांनी अवघ्या दहा महिन्यात केमिकल रॉकेट प्रोपल्शनमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. इतक्या कमी वेळात ही पदवी मिळवण्याचा विक्रम त्यांनी नोंदवला.

अवश्य पाहा - दिशा पटानी कशी झाली इतकी Fit & Fine; सांगितलं आपल्या Fitnessचं रहस्य

अमेरिकेत त्यांना चांगल्या नोकरीची संधी चालून आली; पण ती लाथाडत ते भारतात परतले आणि इस्रोमध्ये रुजू झाले. 1970 च्या दशकात फ्युएल रॉकेट तंत्रज्ञानाचा (Fuel Rocket Technology) पाया त्यांनी घातला. त्यावेळी एपीजे अब्दुल कलाम (ApJ Abdul Kalam) यांची टीम सॉलिड मोटारवर काम करत होती. भारतातील पहिली लिक्विड प्रॉपेलंट मोटार विकसित करण्याचे श्रेय नंबी यांनाच जाते.

सतीश धवन, यु. आर. राव या दिग्गजांचे त्यांना नेहमीच पाठबळ मिळाले. 1992 मध्ये हे तंत्रज्ञान रशियाला 235 कोटी रुपयांना विकण्याचा करार ही झाला होता. मात्र अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे हा व्यवहार होऊ शकला नाही. या आंतरराष्ट्रीय व्यवहारामुळं सगळयांचे लक्ष भारताकडं वळलं. क्रायोजेनिक इंजिनाशी संबधित व्यवहाराचा मुद्दा वारंवार चर्चिला जाऊ लागला आणि 1994 मध्ये इस्रोमधील हेरगिरीचं प्रकरण पुढं आलं. या प्रकरणात नंबी नारायण यांच्यावर परदेशी दलालांना फ्लाईट टेस्ट डेटा कोट्यवधी रुपयांच्या बदल्यात विकल्याचा आरोप ठेवण्यात आला. गुन्हे अन्वेषण विभागानं त्यांना अटक करून चौकशी सुरू केली.

या चौकशी दरम्यान आपल्याला अमानुषपणे वागवण्यात आल्याचं तसेच दबाव आणून इस्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध जबाब घेण्यात आल्याचा दावा नंबी नारायण यांनी केला. 1996 मध्ये केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनं (CBI) नंबी यांच्याविरुद्ध लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचं जाहीर केलं. 1998 मध्ये सर्वोच्च नायालयानं (Supreme Court) ही याला दुजोरा देत नंबी निर्दोष असल्याचं स्पष्ट केलं; मात्र तोपर्यंत नंबी नारायण यांची निवृत्ती जवळ आली होती. त्यांचं करिअर, त्यांची महत्त्वाकांक्षा सगळं धुळीला मिळालं होतं. 2001 मध्ये ते निवृत्त होणार होते.

नंबी नारायण यांनी ही केस पुढे लढवायची ठरवलं. अखेर सप्टेंबर 2018 मध्ये खोटे आरोप करून त्यांना करण्यात आलेली अटक, अटकेदरम्यान त्यांच्यावर झालेले अनन्वित अत्याचार याची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं तीन न्यायाधीशांची एक समिती नेमली. त्यांनी चौकशी केल्यानंतर केरळ सरकारला नंबी यांच्या मानसिक त्रासापोटी 50 लाख रुपये देण्याचा आदेश दिला. केरळ सरकारनं या आदेशाचे पालन करत नंबी यांना व्याजासह 1.3 कोटी रुपये दिले. त्यानंतर 2019 मध्ये नंबी नारायण यांना भारत सरकारनं भारतातील सर्वोच्च मानाचा तिसरा नागरी पुरस्कार पद्मभूषण (Padambhushan Award) पुरस्कार प्रदान केला आणि त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन करण्याचा प्रयत्न केला.

First published: April 5, 2021, 7:35 PM IST

ताज्या बातम्या