मुंबई, 30 जानेवारी: रोडीज सीजन-9 चा विजेता असलेल्या विकास खोकर (Vikas Khoker) याने बीग बॉस -11 फेम विकास गुप्तावर धक्कादायक आरोप केले आहेत. एका न्युज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत त्याने म्हटलं की, 'विकास गुप्ता बीग बॉसच्या घरात रडून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने भूतकाळात केलेल्या चुकांची सजा त्याला मिळत आहे. सध्या देव माझ्यासोबत न्याय करत आहे. विकासचे असे कर्म आहेत, ज्यामुळे त्याला रडावं लागतंय. 2012 मध्ये रोडीजचा विजेता बनल्यानंतर मला अनेक ऑफर मिळाल्या.' संजीवनी, कसौटी जिंदगी के 2 आणि एक था राजा एक थी रानी फेम विकास खोकर याने विकास गुप्तावर गंभीर आरोप केले आहेत.
विकास खोकर याने पुढं सांगितलं की, 'त्या 'शो' मधून बाहेर पडल्यानंतर मला काही अशीही लोकं मिळाली, ज्यांनी मला म्हटलं की, सेक्सुअल कॉम्प्रोमाइज केलं तर तुला मोठी ऑफर देण्यात येईल. आम्ही तुला स्टार बनवू. या लोकांमध्ये एकजण विकास गुप्ताही होता. विकासने स्वतः च्या लैगिंक गरजा पूर्ण करण्यासाठी मला अत्यंत वाईटरित्या अप्रोच केलं होतं. त्यावेळी अंधेरी वेस्ट मध्ये एक चहाचं दुकान होतं. असं म्हटलं जायचं की या शॉपमध्ये एकता कपूर येते.'
(हे वाचा-लग्नाच्या महिन्याभरानंतर सना खानची 'Heartbroken' पोस्ट; केलं भावनिक आवाहन)
'एकता कपूरची ओळख होईल, या आशेनं मी मीही तिथे जायला लागलो. दरम्यान माझी ओळख विकास गुप्ता सोबत झाली. ज्यावेळी माझी विकास गुप्ताशी ओळख झाली, त्यावेळी तिथे पार्थ समथान, विकासचा भाऊ सिद्धार्थ गुप्ता आणि बालाजी टेलेफिल्म्सचे काही क्रिएटिव्ह्स बसले होते. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की, मी रोडीजचा विजेता आहे. त्यानंतर आम्ही आमचे मोबाइल नंबर एकमेकांना दिले. त्यानंतर विकासने मला फोन करून त्याच्या घरी भेटायला येण्याची विनंती केली. त्यासाठी त्याने मला त्याच्या घराचा पत्ताही पाठवला.'
(हे वाचा-KGF2 Release Date: 'ह्या' तारखेला प्रदर्शित होणार आता KGF2)
यावेळी मी त्याला म्हटलं की, आपण एखाद्या कॉफी शॉपमध्ये भेटू. यावर विकास गुप्ता म्हणाला की, 'तू घरीच ये, बॉडी पेन होत आहे, म्हणजे मला आल्यानंतर मसाजही करुन देशील.' हे ऐकल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला काय करावं हे सुचलं नाही. त्यानंतर विकासने मला आणखी एकदा बोलावलं आणि माझे काही फोटो पाठवायला सांगितली. त्यानंतर त्याने मला माझ्या प्रायवेट भागाचा फोटोही पाठवायला लावला. यावेळी मला खूप राग आला होता, पण मला भीती होती की, तो मला इंटस्ट्रीमध्ये ब्लॉक करेल. विकास माझ्यासोबत रिलेशनमध्ये राहू इच्छित होता,' असे अनेक आरोप विकास खोकरने विकास गुप्तावर केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.