VIDEO : कमाल! रस्त्यावरच्या महिलेचं हे गाणं ऐकून तुम्हाला येईल लतादीदींची आठवण

VIDEO : कमाल! रस्त्यावरच्या महिलेचं हे गाणं ऐकून तुम्हाला येईल लतादीदींची आठवण

पश्चिम बंगालच्या राणाघाट रेल्वे स्टेशनवर एक महिला लतादीदींचं 'एक प्यार का नगमा है' गात होती. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 1 ऑगस्ट : लोकलने प्रवास करताना किंवा ट्रॅफिक जॅममध्ये एखादी छान सुरावट कानावर पडली तर मनाला सुकून मिळतो. पश्चिम बंगालच्या राणाघाट रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना असाच अनुभव आला.

रस्त्यावरची एक महिला लतादीदींचं 'एक प्यार का नगमा है' गात होती. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

पश्चिम बंगालमधल्या बापरेटा या शांत गावातल्या या व्हिडिओेमध्ये लता मंगेशकरांचं हे गाणं ऐकून सगळेच जण लतादीदींच्या आवाजाच्या सुवर्णयुगात गेले. 'शोर' सिनेमातलं हे गाणं संतोष आनंद यांनी लिहिलं आहे आणि त्याला संगीत आहे, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. या व्हिडिओला सोशल मीडियावर 43 हजार लाइक्स मिळाले आणि 4 हजार 200 कमेंट्स मिळाल्या.

एका कमेंटमध्ये लिहिलंय, या महिलेच्या कपड्यांवरून ती अगदीच साधीसुधी वाटते पण तिचं गाणं ऐकलं की तिच्या प्रतिभेने आपण थक्क होतो.

दुसरी एक कमेंट आहे, या महिलेने आयुष्यात खूप काही सोसलं असावं. त्यामुळेच तिच्या आवाजात एवढा दर्द आहे.

तिच्या डोळ्यांत वेदना आहे आणि त्या वेदनेतूनच हे सूर उमटले आहेत, असंही एकाने लिहिलं आहे. हा व्हिडिओ पाहून कुणीतरी संगीतकाराने पुढे यावं आणि तिला गाण्याची संधी द्यावी, अशीही अपेक्षा नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

बारपेटा टाउनच्या फेसबुक पेजवर याच महिलेच्या आवाजातलं ए मेरे वतन के लोगों हे गाणंही पोस्ट करण्यात आलं आहे.

हेही वाचा : मी काय करू शकतो...; Zomatoच्या डिलिव्हरी बॉयने दिली हताश प्रतिक्रिया!

==========================================================================================

'पतली कमर'वर महिला पोलिसांचा TIKTOK व्हिडिओ व्हायरल

<iframe class="video-iframe-bg-color iframe-onload" onload="resizeIframe(this)" id="story-395968" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/Mzk1OTY4/"></iframe>

Published by: Arti Kulkarni
First published: August 1, 2019, 3:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading