S M L

'या' सिनेमाच्या यशानंतर खरेदी केली होती आरके स्टुडिओची जमीन

खूप विचारविनिमय करून कपूर कुटुंबानं हा जड अंत:करणानं निर्णय घेतलाय. 2.2 एकरमध्ये पसरलेल्या या स्टुडिओला चालवणं सोपं नव्हतं.

Updated On: Aug 31, 2018 12:16 PM IST

'या' सिनेमाच्या यशानंतर खरेदी केली होती आरके स्टुडिओची जमीन

जयश्री पिंगळे

मुंबई, 31 आॅगस्ट : आरके स्टुडिओ आता असणार नाही. या बातमीनं मी अस्वस्थ झाले. कपूर कुटुंबातल्या सदस्यांना जेवढा त्रास होत असेल, तेवढाच त्रास मला होतोय. खूप विचारविनिमय करून कपूर कुटुंबानं हा जड अंत:करणानं निर्णय घेतलाय. 2.2 एकरमध्ये पसरलेल्या या स्टुडिओला चालवणं सोपं नव्हतं.

काळ बदललाय. सिनेमाही बदललाय.मुंबईमधल्या चेंबुरला आरके स्टुडिओ आहे. कुठल्याही फिल्ममेकरला तिथे पोचणं सोपं नाहीय. सगळी फिल्म इंडस्ट्री जुहू, वांद्रा, लोखंडवालाच्या जवळपास पसरलीय.मुंबईचा ट्रॅफिर पाहता तिथपर्यंत पोचणं अवघडच आहे. त्यामुळे स्टुडिओची पहिली चमक काही राहिली नाहीय.

आज मला राज कपूर यांच्यासोबत घालवलेले क्षण आठवतात. आम्ही खूप वेळ एकत्र होतो. माझ्या चार सिनेमांची शूटिंग्ज एका वेळी आरके स्टुडिओत होत होती. या स्टुडिओतले पहिले दोन फ्लोअर शूटिंगसाठी होते. तिथे काॅलेप्सिएल वाॅल होती. एखादा भव्य सेट लावायचा असेल तर ही भिंत हटवली जायची. जवळच श्रीकांत स्टुडिओ होता. त्यावेळी तो विकायला काढलेला. राज कपूरनी तो खरेदी केला होता. जवळ जवळ 15 दिवस चारही फ्लोअरवर माझ्या सिनेमांची शूटिंग्ज सुरू होती.

सिनेमा होता वापसी. त्यात राखी गुलजारवर एक गाणं चित्रित होत होतं. हरजाई सिनेमाचं शूटिंग सुरू होतं. आणि आणखी एक होता कन्हैया. शायद सिनेमाचं शूटिंग मी इंदोरला केलं होतं. पण थोडं पॅचवर्क बाकी होतं. या सिनेमांच्या शूटिंग वेळी राज कपूर असायचे. एका व्यक्तीसाठी अख्खा स्टुडिओ बुक केल्याचं पाहून ते खूश व्हायचे.

Loading...
Loading...

राखी, राजेश खन्ना, झीनत अमान, प्राण यांसारखे कलाकार त्या सिनेमांमध्ये होते. दुपारी जेवणासाठी सगळे एकत्र जमायचे. राज कपूर असले की सगळं वातावरण एकदम आनंदी असायचं. आरकेची ओळखच हा दिलखुलासपणा होता. तिथे सगळे बरोबरीनंच असायचे. एका कुटुंबासारखं वातावरण असायचं. राज कपूरच्या उपस्थितीत या स्टुडिओत एक रंगीन माहोल असायचा त्याचा जबाब नसायचा. मोठमोठ्या कलाकारांना राज कपूर यांच्यासोबत काम करण्याची इच्छा असायची. आरके स्टुडिओ राज कपूर यांचा ड्रीम प्रोजेक्ट असायचा. आजही तिथं वेगळी स्पंदनं जाणवतात. आजही राज कपूर आणि आरके स्टुडिओ यांना वेगळं करता येणार नाही.

राज कपूर यांनी 22व्या वर्षी आग सिनेमा बनवला. बाॅक्स आॅफिसवर आग फारसा चालला नाही. तरीही  राज कपूर निरुत्साही कधीच नव्हते. त्यांनी डबल उत्साहात 9 महिन्यांनी बरसात बनवली. काम सुरू झालं होतं तेव्हा आग सिनेमाचे संगीत दिग्दर्शक होते राम गांगुली. त्यांच्या सोबत बसून राज कपूर यांनी 3 चाली बनवल्या. पण रेकाॅर्ड केल्या नाहीत.

काही दिवसांनी राम गांगुलींनी एक चाल दुसऱ्या निर्मात्याला दिली. कदाचित 22 वर्षाच्या या तरुणावर त्यांचा विश्वास नसेल. त्यांना वाटलं, ज्याचा एक सिनेमा इतका आपटलाय, तो लवकर दुसरा सिनेमा काही बनवू शकणार नाही. राज कपूरना ही गोष्ट कळली. ते नाराज नाही झाले की गांगुलींशी भांडायलाही गेले नाहीत. उलट त्यांनी वर्तमानपत्रात घोषणा केली की बरसातचे संगीत दिग्दर्शक राम गांगुली नाही तर शंकर जयकिशन असताल. पृथ्वी थिएटरमध्ये शंकर जयकिशन नाटकाचं पार्श्वसंगीत द्यायचे. ते राम गांगुलींचे सहाय्यक होते.

त्यांनी शंकर जयकिशनना संधी देऊन अनेक प्रस्थापित संगीतकारांना झटका दिला. बरसातची गाणी लवकर बनली. गाण्यांच्या राॅयल्टीवरच बरसातचा फायदा झाला. जे पैसे मिळाले त्यात राज कपूर यांनी चेंबुरमध्ये 2.2 एकर जमीन खरेदी केली.चेंबुरमध्ये खरेदी करण्याचं कारण म्हणजे तिथे डोंगर, हिरवा निसर्ग आणि शांतता होती.

ही मुंबई होती 1948ची. आऊटडोअर शूटिंग करायचं असेल तर दहा पावलं बाहेर पडा. त्या काळात तर वाघ, सिंहही फिरायचे. आजच्या सारखी तेव्हा गर्दी नव्हती.

( राज कपूरचे जवळचे मित्र, सिने समीक्षक जयप्रकाश चौकसेंनी न्यूज18शी आरकेच्या आठवणी शेअर केल्या )

Bigg Boss 12 : लिक झाली यादी, हे 6 सेलिब्रिटी होणार सहभागी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 31, 2018 12:16 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close