VIDEO : गणपतीची आरती करताना रणधीर कपूर झाले इमोशनल

VIDEO : गणपतीची आरती करताना रणधीर कपूर झाले इमोशनल

आर. के. स्टुडिओच्या अनेक आठवणी आहेत. त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरकेचा गणेशोत्सव. आता हा स्टुडिओ विकायला काढलाय, म्हणजेच यावेळचा गणेशोत्सव शेवटचा.

  • Share this:

मुंबई, 15 सप्टेंबर : आर. के. स्टुडिओच्या अनेक आठवणी आहेत. त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरकेचा गणेशोत्सव. आता हा स्टुडिओ विकायला काढलाय, म्हणजेच यावेळचा गणेशोत्सव शेवटचा.

राज कपूर यांनी ७० वर्षांपूर्वी या स्टुडिओची स्थापना केली होती. मात्र, लवकरच हा स्टुडिओ इतिहासजमा होणार आहे. या आर. के. स्टुडिओमध्ये गेल्या ७० वर्षांत नित्यनेमाने गणेशोत्सव साजरा होत आहे.  यावर्षीही हा साजरा होत आहे. पण यावर्षीचा, गणेशोत्सव हा आर. के. स्टुडिओमधील शेवटचा गणेशोत्सव असणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीचीही आर. के. स्टुडिओतील गणेश स्थापनेला संपूर्ण कपूर परिवार एकत्र आलेला दिसला.

 

View this post on Instagram

 

#ganeshaarti at #RKStudios #RishiKapor #RandhirKapoor #RanbirKapoor #ganpatibappamorya #ganeshchaturthi @ravijain0701 video

A post shared by Bollywood (@filmyhaiboss) on

रणधीर कपूर, राजीव कपूर आरती करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. रणधीर कपूर खूप इमोशनल झाले होते. आरकेचा गणपती 10 दिवस असतो. त्याची विसर्जन मिरवणूकही मोठी थाटात काढली जाते. ऋषी कपूर, रणबीर कपूर सगळे या गणेशोत्सवात उपस्थित असतात.

1947मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि 1948 मध्ये शोमॅन राज कपूर यांच्या स्वप्नाची पूर्तता झाली ती आरके स्टुडिओच्या रूपानं. भारतीय सिनेमाच्या सुवर्ण इतिहासातील ही दंतकथा. गेली 7 दशकं आरके स्टुडिओनं चित्रपट सृष्टीतील अनेक पिढ्या पाहिल्या.

मागील वर्षी सप्टेंबरमध्ये आरके स्टुडिओमधील काही भाग आगीने जळून खाक झाला.आर.के. स्टुडिओ आता विकण्यात येणार आहे.हा पांढरा हत्ती पाळणं आता शक्य नाही, त्यामुळे स्टुडिओ विकणं योग्य ठरेल असं ऋषी कपूर यांनी सांगितलं. आरके स्टुडिओ आता राहणार नाही पण राहतील या सुवर्णकाळाच्या कधीही न भंगणाऱ्या सोनेरी आठवणी.

बाॅलिवूड स्टार्सनी बाप्पाचं स्वागत केलं जल्लोषात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2018 04:53 PM IST

ताज्या बातम्या