रिया चक्रवर्ती मुंबईतच, बिहार पोलिसांवर भडकले वकील मानेशिंदे

रिया चक्रवर्ती मुंबईतच, बिहार पोलिसांवर भडकले वकील मानेशिंदे

बिहार पोलिसांनी मुंबईत येऊन तपास सुरू केल्यानंतर अनेक गोष्टी समोर येत असल्याचे दिसत आहे

  • Share this:

मुंबई, 3 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात बिहार पोलिसांनी मुंबईत येऊन तपास करण्यास सुरू केल्यापासून चक्र फिरल्याचे दिसून येत आहे. बिहार पोलिसांनी सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेचा जबाब नोंदविला आहे. याप्रकरणात बिहार पोलीस रियाकडून जबाब नोंदविण्याचा प्रयत्न करीत आहेत. रियाने देशातील सर्वात प्रसिद्ध आणि महागडे वकील सतीश मानेशिंदे यांना ही केस सोपवली आहे.

बिहार पोलिसांकडून रिया बेपत्ता असल्याची बातमी समोर येताच सतीश मानेशिंदे यांनी याबाबत स्टेटमेंट जारी केलं आहे. बिहार पोलिसांकडून रिया चक्रवर्तीच्या चौकशीसाठी प्रयत्न केले जात होते. मात्र ती सापडली नाही. यानंतर पोलिसांनी रिया चक्रवर्ती गायब असल्याचे म्हटले होते. या आरोपानंतर रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी एक स्टेटमेंट जारी केलं आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की - रिया चक्रवर्ती बेपत्ता असल्याचा बिहार पोलिसांचा आरोप चुकीचा आहे. रियाचा जबाब मुंबई पोलिसांकडून नोंदविण्यात आला आहे.

हे वाचा-SSR Death Case: 'त्या' घटनेबाबत नितीश कुमार करणार ठाकरे सरकारशी चर्चा

रियाकडून पोलिसांना वेळोवेळी मदत केली जात आहे. बिहार पोलिसांकडून अद्याप तिला नोटीस वा समन्स पाठविण्यात आलेला नाही. शिवाय हे त्यांचं कार्यक्षेत्र नसल्यामुळे ते येथे तपास सुरू शकत नाहीत. याबाबत सर्वोच्च न्यायालयात कार्यवाही सुरू आहे. तिने याबाबतची केस मुंबईत ट्रान्सफर केली आहे. ही केस न्यायालयप्रवीण आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: August 3, 2020, 4:17 PM IST

ताज्या बातम्या