VIDEO : सलमान खाननं रितेशच्या 'माऊली'चा ट्रेलर केला ट्विट, तुम्ही पाहिलात का?

डिसेंबरमध्ये रितेश देशमुखचा 'माऊली' सिनेमा रिलीज होतोय. सिनेमाचा टीझर आणि गाणं लाँच झालं होतं. पण आता माऊली सिनेमाचा ट्रेलर लाँच झालाय.

News18 Lokmat | Updated On: Nov 29, 2018 05:53 PM IST

VIDEO : सलमान खाननं रितेशच्या 'माऊली'चा ट्रेलर केला ट्विट, तुम्ही पाहिलात का?

मुंबई, 29 नोव्हेंबर : डिसेंबरमध्ये रितेश देशमुखचा 'माऊली' सिनेमा रिलीज होतोय. सिनेमाचा टीझर आणि गाणं लाँच झालं होतं. पण आता माऊली सिनेमाचा ट्रेलर लाँच झालाय.


या ट्रेलरमध्ये अख्ख्या सिनेमाची झलक दिसते. रितेश देशमुखची व्यक्तिरेखा सर्जेराव देशमुखची आहे. गावातल्या अन्यायाविरोधात तो आवाज उठवतोय. गुंडांना नेस्तनाबुत करतोय. तो इन्स्पेक्टरही आहे आणि वर्दी उतरवल्यावर तो गुंडांचा कर्दनकाळ बनतोय. सयामी खेर या सिनेमात नायिका आहे.


सलमान खाननं माऊलीचा ट्रेलर ट्विट केलाय. सर्वांचा भाऊ  आणि आपला माऊली येतोय. एन्ट्रीवर शिट्टी वाजवा, असंही त्यानं म्हटलंय.





माऊली सिनेमात सिद्धार्थ जाधवचीही भूमिका आहे.सिनेमाचं दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलंय, तर अजय अतुलचं संगीत आहे. क्षितीज पटवर्धन यांनी सिनेमा लिहिलाय.


रितेश देशमुखची बायको जेनेलिया या सिनेमाच्या निर्मितीचं काम पाहतेय. मध्यंतरी माऊली सिनेमाबद्दल बोलताना रितेश म्हणाला होता, 'लय भारी सिनेमाला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे आता मराठीत अभिनय करण्यात मला जास्त इंटरेस्ट आहे. मला साहसदृश्य आणि मनोरंजनपूर्ण चित्रपटांमध्ये झळकायला आवडेल. विशेष म्हणजे 'माऊली' चित्रपटाची पटकथा वाचल्यानंतर पुन्हा एकदा मराठी चित्रपटामध्ये पदार्पण करण्याचा निर्णय मी घेतला.'




माऊली सिनेमाचं पहिलं गाणं सोशल मीडियावर रिलीज झालं. विठ्ठलाच्या या गाण्याचं संगीत दिलंय अजय-अतुल यांनी. साजिरे स्वरूप सुंदर ,तहानभूक हारपून जाय ,माझी पंढरीची माय , माझी पंढरीची माय... हे नवं गाणं भेटीला आलंय माऊली या नव्या सिनेमात.


रितेश देशमुखचा माऊली अगोदर 21 डिसेंबरला रिलीज होणार होता. आता तो  14 डिसेंबरला भेटीला येतोय. कदाचित सिंबा सिनेमाशी टक्कर नको, म्हणून रितेशनं हे पाऊल उचललं असावं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 29, 2018 05:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close