VIDEO : रितेश देशमुखच्या 'माऊली'चं पहिलं गाणं लाँच

VIDEO : रितेश देशमुखच्या 'माऊली'चं पहिलं गाणं लाँच

माऊली सिनेमाचं पहिलं गाणं सोशल मीडियावर रिलीज झालं. विठ्ठलाच्या या गाण्याचं संगीत दिलंय अजय-अतुल यांनी.

  • Share this:

मुंबई, 19 नोव्हेंबर : डिसेंबर महिन्यात सिनेप्रेमींना चांगलीच ट्रीट मिळणार आहे. एक तर रणवीर सिंगचा सिंबा रिलीज होतोय. आणि दुसरा रितेश देशमुखचा मराठी सिनेमा 'माऊली'.

माऊली सिनेमाचं पहिलं गाणं सोशल मीडियावर रिलीज झालं. विठ्ठलाच्या या गाण्याचं संगीत दिलंय अजय-अतुल यांनी. साजिरे स्वरूप सुंदर ,तहानभूक हारपून जाय ,माझी पंढरीची माय , माझी पंढरीची माय... हे नवं गाणं भेटीला आलंय माऊली या नव्या सिनेमात.

रितेश देशमुखचा माऊली अगोदर 21 डिसेंबरला रिलीज होणार होता. आता तो  14 डिसेंबरला भेटीला येतोय. कदाचित सिंबा सिनेमाशी टक्कर नको, म्हणून रितेशनं हे पाऊल उचललं असावं.

अजय-अतुलने गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं 'माझी पंढरीची माय' हे गाणं विठूमाऊलीच्या भक्तांना विशेष आवडेल असंच आहे.

या गाण्यात रितेश देशमुख, सयामी खेर, अजय-अतुल सगळेच दिसतायत.लय भारी सिनेमात रितेशचं नाव माऊली होतं. त्यात तो माऊली आपल्या आईला न्याय मिळवून देतो. तिच्यासाठी प्राणाची बाजी लावतो, अशी गोष्ट होती. लय भारी सुपर डुपर हिट झाला होता. त्यामुळे माऊलीबद्दलही अपेक्षा आहेत.

माऊली सिनेमात सिद्धार्थ जाधवचीही भूमिका आहे.सिनेमाचं दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलंय, तर अजय अतुलचं संगीत आहे. क्षितीज पटवर्धन यांनी सिनेमा लिहिलाय.

रितेश देशमुखची बायको जेनेलिया या सिनेमाच्या निर्मितीचं काम पाहतेय. मध्यंतरी माऊली सिनेमाबद्दल बोलताना रितेश म्हणाला होता, 'लय भारी सिनेमाला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे आता मराठीत अभिनय करण्यात मला जास्त इंटरेस्ट आहे. मला साहसदृश्य आणि मनोरंजनपूर्ण चित्रपटांमध्ये झळकायला आवडेल. विशेष म्हणजे 'माऊली' चित्रपटाची पटकथा वाचल्यानंतर पुन्हा एकदा मराठी चित्रपटामध्ये पदार्पण करण्याचा निर्णय मी घेतला.'

ऐश्वर्याच्या लुकपुढे करिना पडली फिकी; अॅवॉर्ड फंक्शनला आणखी कोण झळकलं बघा

First published: November 19, 2018, 1:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading