Video : रितेशची बिग बॉसच्या घरात एण्ट्री, इन्स्पेक्टर माऊली सदस्यांना देणार शिक्षा

रितेश देशमुख आणि सलमान खान 'लयभारी' सिनेमातून मोठ्या पडद्यावर एकत्र दिसले होते. आता 'माऊली' चित्रपटाच्या निमित्तानं ते दोघे छोट्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. बिग बॉस सिझन-12 कार्यक्रमात रितेशने काय धमाल केली आहे ते पाहा

News18 Lokmat | Updated On: Dec 8, 2018 04:16 PM IST

Video : रितेशची बिग बॉसच्या घरात एण्ट्री, इन्स्पेक्टर माऊली सदस्यांना देणार शिक्षा

मुंबई, 08 डिसेंबर : अभिनेता रितेश देशमुखचा माऊली सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहूनच सर्व प्रेक्षकांनी लयभारी प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू असून येत्या 14  डिसेंबरला माऊली सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाची निर्मिती रितेशची पत्नी जेनिलिया देशमुखनं केली असून आदित्य सरपोतदारनं चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. सध्या चित्रपटाचे प्रोमोशन सुरू आहेत. आत्तापर्यंत रितेश देशमुखने मराठीतील वेगवेगळ्या कार्यक्रमातून चित्रपटाचं प्रोमोशन केलं आहे. परंतु आता पहिल्यांदाच मराठी चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी रितेश देशमुख भाईजान सलमानच्या बिग बॉस सिझन-12  शोमध्ये दिसणार आहे.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या बिग बॉस सिझन-12 कार्यक्रमात रितेश देशमुख दिसणार आहे. माऊली चित्रपटातील इन्स्पेक्टर सरजेराव देशमुख बिग बॉसच्या घरातील सदस्यांवर कारवाई करताना दिसणार आहे.

याआधी लयभारी सिनेमात रितेशसोबत सलमान खान एका विशेष भूमिकेत मोठ्या पडद्यावर दिसला होता. यानंतर माऊली सिनेमाच्या निमित्तानं सलमान आणि रितेश छोट्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

बिग बॉस सिझन-12 कार्यक्रमात रितेशने सदस्यांसोबत बरीच धमाल करतो आहे. याच निमित्तानं सिनेमाचं प्रोमोशनही सुरू आहे. इन्स्पेक्टर देशमुखने घरातील सदस्य करमवीर बोहराला शिक्षा सुद्धा दिला आहे.

Loading...

चित्रपटात रितेश देशमुखसोबत, जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव, सय्यामी खेर आणि गिरीजा ओक हे कलाकार असणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 8, 2018 04:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...