मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Ritesh Deshmukh: 'आता वेडेपणा होणार सुरु',रितेशने सलमान भाऊसोबत शेअर केली धमाल पोस्ट!

Ritesh Deshmukh: 'आता वेडेपणा होणार सुरु',रितेशने सलमान भाऊसोबत शेअर केली धमाल पोस्ट!

रितेश देशमुख (Ritesh Deshmukh and Salman Khan) या अभिनेत्याने बॉलिवूडचा भाई सलमान खानसाठी एक खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे.

रितेश देशमुख (Ritesh Deshmukh and Salman Khan) या अभिनेत्याने बॉलिवूडचा भाई सलमान खानसाठी एक खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे.

रितेश देशमुख (Ritesh Deshmukh and Salman Khan) या अभिनेत्याने बॉलिवूडचा भाई सलमान खानसाठी एक खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे.

मुंबई 10 जुलै: आजच्या आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर अनेक मराठी कलाकार प्रेक्षकांना शुभेच्छा देताना दिसत आहे. रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) या अभिनेत्याचं आषाढी एकादशीसोबत एक आगळंवेगळं नातं आहे. त्याच्या लई भारी सिनेमात विठ्ठलाचं महत्त्वपूर्ण स्थान असल्याचं बघायला मिळालं होतं. रितेशने सुद्धा आजच्या दिवशी एक खास पोस्ट शेअर करून आनंदाची बातमी आपल्या प्रेक्षकांसोबत शेअर केली आहे.

अभिनयासोबत रितेश (Riteish Deshmukh) आता दिग्दर्शनात सुद्धा पदार्पण करणार आहे. दिग्दर्शकी म्हणून भमिका पाहणाऱ्या त्याच्या पहिल्या वहिल्या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झाल्याची बातमी रितेशने instagram पोस्टद्वारे शेअर केली आहे. रितेशचा डिरेक्शन डेब्यू असणारा ‘वेड’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एवढंच नाही तर लई भारी सारखं या सिनेमात सुद्धा बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) एका खास अंदाजात पाहायला मिळणार आहे.

रितेशने बॉलिवूडच्या भाईजानचे आभार सुद्धा या पोस्टमध्ये मानले आहेत. रितेश असं म्हणतो, “आजच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, शांती समृद्धी आणि भरभराट येवो अशी मी प्रार्थना करतो. आपल्याला सांगायला आनंद होत आहे की तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या दिग्दर्शक म्हणून पहिल्या फिल्म ‘वेड’ चं शूटिंग आज पूर्ण झालं आहे.

हे ही वाचा- Varun Bhagwat: 'ज्ञानेश्वर माऊली' फेम अभिनेता सांगतोय पांडुरंग आणि Google Maps यांचं अनोखं कनेक्शन!

"या वाटेवर सुद्धा अनेक समस्या आल्या पण जेव्हा तुम्ही योग्य व्यक्तींसोबत असता जे कायम तुमच्या पाठीशी उभे असतात तेव्हा हा प्रवास सोपा होऊन जातो. एक व्यक्ती सलमान भाऊ यांचे मनापासून आभार मानतो. ‘लई भारी’ या माझ्या मराठी डेब्यू फिल्ममधे ते माझ्यासोबत होते आणि आज मी दिग्दर्शनात पदार्पण करत असतानाही ते माझ्यासोबत आहेत. लव यु भाऊ!

रितेशच्या ‘लई भारी’ सिनेमात एका छोट्याशा भूमिकेत सलमान दिसून आला होता. त्या छोट्याशा भूमिकेत सुद्धा सलमान भाऊने आपली जादू दाखवून दिली होती.

View this post on Instagram

A post shared by Ritesh Deshmukh (@riteishd)

रितेशच्या या नव्या कोऱ्या चित्रपटात सुद्धा सलमान काय धमाल आणतो हे पाहणं गंमतशीर असणार आहे. या सिनेमातून जेनेलिया देशमुख मराठीमध्ये पदार्पण करणार आहे. तसंच अशोक सराफ हे सुद्धा या सिनेमाचा एक भाग असणार आहेत.

First published:
top videos

    Tags: Ashadhi Ekadashi, Riteish Deshmukh, Ritesh deshmukh, Salman khan