कोरोना काळात पोटासाठी वृद्धेची 'कसरत'; VIDEO शेअर करत रितेश देशमुख म्हणाला Warrior Aaji

कोरोना काळात पोटासाठी वृद्धेची 'कसरत'; VIDEO शेअर करत रितेश देशमुख म्हणाला Warrior Aaji

रितेश देशमुखने (ritesh deshmukh) आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका वृद्ध महिलेचा व्हिडीओ शेअर केला आहे.

  • Share this:

मुंबई, 23 जुलै : कोरोना लॉकडाऊनमध्ये (corona lockdown) अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कुणाचं काम बंद, कुणाचे पगार कापले, कुणाची नोकरी गेली. कित्येकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे. हातावर पोट असलेल्यांचे तर हालच होत आहेत. पोट भरण्यासाठी रस्त्यावर कसरत करणाऱ्या अशाच एका आजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अभिनेता रितेश देशमुखने (ritesh deshmukh) हा व्हिडीओ शेअर केला आहे.

रितेश देशमुखने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका वृद्ध महिलेचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ही महिला लाठीकाठी खेळताना दिसते आहे. आपलं कौशल्य सादर करत ती पोट भरण्याचा प्रयत्न करत आहे. रितेश देशमुखनं या वृद्ध महिलेला वॉरिअर आजी (Warrior Aaji) असं म्हटलं आहे.

View this post on Instagram

Warrior Aaji

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd) on

कोरोना लॉकडाऊनमुळे मुंबईतील अशा अनेक परप्रांतीय मजुरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आणि त्यांनी आपल्या गावाची वाट धरली. यावेळी अभिनेता सोनू सूद त्यांच्या मदतीला आहे. त्याने या मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्याची सोय गेली. शिवाय आता त्यांच्याच गावात त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं आश्वासनही दिलं आहे

हे वाचा - सुपरहिरो नाही देवदूत; मुलांच्या शिक्षणासाठी गाय विकणाऱ्या कुटुंबासाठी धावला सोनू

महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसचा (Coronavirus maharashtra updates) उद्रेक सुरूच आहे. गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार एकाच दिवसात 9895 कोरोनारुग्णांचं निदान झालं. बुधवारीही दहा हजारांवर नव्या कोरोनारुग्णांचं निदान झालं होतं. 24 तासांत पाच आकडी नवे रुग्ण सापडण्याचा कालचा पहिलाच दिवस होता. गुरुवारीही मोठ्या संख्येने रुग्णवाढ झाल्याने राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता 3 लाख 47 502 झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 12,556 वर गेला आहे. दिवसभरात 298 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे आता कोरोनाबळींची संख्याही 12854 झाली आहे. राज्यभरात उपचार सुरू असलेले (Active corona patients) तब्बल 1,40,092 रुग्ण आहेत.

हे वाचा - उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, महत्त्वाच्या निवडणुका 3 महिन्यांसाठी पुढे ढकलल्या

Unlock नंतर Corona रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली. मुंबईपेक्ष पुण्यात रुग्णवाढीचा वेग प्रचंड वाढला आहे. आता सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा कहर कायम आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात गुरूवारी रात्री 12 वाजता 10 दिवसांचा लॉकडाऊन संपणार आहे. मात्र, शुक्रवारपासून 31 जुलैपर्यंत आधीचेच नियम आहे तसेच राहतील, असं जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितलं आहे. तर पुढील शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन ठेवा, व्यापाऱ्यांनी केलेल्या या मागणीवर प्रशासन विचार करत असल्याचं पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितलं आहे.

Published by: Priya Lad
First published: July 23, 2020, 11:26 PM IST

ताज्या बातम्या