Home /News /entertainment /

'मेरी तो किस्मत ही खराब है' म्हणत रितेश देशमुखनं शेअर केला VIDEO!

'मेरी तो किस्मत ही खराब है' म्हणत रितेश देशमुखनं शेअर केला VIDEO!

रितेश देशमुख हा सोशल मीडियावरही कायमच सक्रीय असतो. तो नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. त्याचे अनेक रोमँटिंक आणि फनी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

  मुंबई, 3 जुलै :  प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखनं (ritesh deshmukh)आपल्या अभिनयानं अनेकांना वेड लावलं आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये साकारलेल्या हटके भूमिकेमुळे चाहत्यांनी नेहमीच त्याला भरभरुन प्रेम दिलं आहे. रितेश देशमुख हा सोशल मीडियावरही कायमच सक्रीय असतो. तो नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. त्याचे अनेक रोमँटिंक आणि फनी व्हिडीओ सोशल मीडियावर(social media) व्हायरल होत असतात. अशातच रितेशनं एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर Ritesh deshmukh instagram)शेअर केला आहे. रितेशनं इन्स्टाग्रामवर एक मजेशीर व्हिडीओ(Ritesh deshmukh funny video) शेअर केला आहे. हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये रितेशनं एका काॅमेडी ऑडिओवर लिप्सिंग केलं आहे. यामध्ये त्यानं म्हटलं की, "मेरी तो किस्मत ही खराब है, लगेच पुढून आवाज येतो की शकल भुल गया तू, वो भी खराब है". रितेशचा विनोदी अंदाज यामध्येही पाहायला मिळतो. रितेशच्या या व्हिडीओवर सध्या अनेक मजेशीर कमेंट येत आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर करत लाईक्सचा वर्षाव केला आहे. हेही वाचा - Alka Kubal: 'अशोक मामांनी जमिनीवर राहायला शिकवलं', अलका कुबलांनी सांगितल्या अविस्मरणीय आठवणी रितेश देशमुख आपल्या खास स्टाइलने सोशल मीडियावर अधिराज्य गाजवतो. त्याची स्टाईल चाहत्यांना आश्चर्यचकित करते. कधी तो पत्नीसोबत भांडताना दिसतो तर कधी आपल्या फनी स्टाइलने चाहत्यांना हसवताना दिसतो. त्यांच्या डेली लाईफमधील खास क्षण पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक असतात. रितेश आणि जिनिलियाची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. दोघांचे व्हिडिओ खूप व्हायरल होत असतात.
  View this post on Instagram

  A post shared by Ritesh Deshmukh (@riteishd)

  अभिनेता रितेश देशमुखच्या 'वेद' चित्रपटातून (ritesh deshmukh upcoming movie)दिग्दर्शनाच्या जगात पाऊल ठेवणार आहे. हा मराठी चित्रपट असून सलमान खानही (Salman khan)या चित्रपटाच झळकणार आहे. सलमान खान रितेश देशमुखच्या 'वेद' चित्रपटात काॅमेडी भूमिका करताना दिसणार आहे.  सलमान खान रितेश देशमुखच्या 2014 मध्ये आलेल्या 'लया भारी' या मराठी चित्रपटातही खास भूमिकेत दिसला होता. वेद चित्रपटाच्या माध्यमातून जेनेलियाही खूप काळानंतर अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. जेनेलिया डिसूझाला पाहण्यासाठी चाहत्यांनी खूप दिवसांपासून वाट पाहिली आहे. अखेर त्यांची प्रतिक्षा समाप्त होणार असून लवकरच त्यांना जेनेलिया पडद्यावर पहायला मिळणार आहे. रितेश देशमुखचा 'वेद' हा चित्रपट 12 ऑगस्ट 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Bollywood, Entertainment, Instagram post, Marathi cinema, Marathi entertainment

  पुढील बातम्या