मुंबई, 24 जुलै : रितेश देशमुखच्या 'माऊली' सिनेमाची चर्चा जोरात सुरू आहे. आषाढी एकादशीचं निमित्त साधून रितेशनं माऊलीचं पहिलं पोस्टर रिलीज केलंय. आणि महत्त्वाचं म्हणजे सिनेमा रिलीज कधी होणार याची तारीखही रिलीज केलीय. ती आहे 21 डिसेंबर 2018. सिनेमाचं दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलंय, तर अजय अतुलचं संगीत आहे. क्षितीज पटवर्धन यांनी सिनेमा लिहिलाय.
माऊली सिनेमात रितेश आणि सयामी खेर यांची जोडी पाहायला मिळणार आहे. सयामीचा हा पहिलाच मराठी सिनेमा. त्यामुळे खूप उत्सुकता वाढलीय. रितेशची निर्मिती असलेला बालक पालक आणि लय भारी भरपूर चालला होता. माऊली हा सिनेमा लय भारी सिनेमाचा सिक्वल आहे. लय भारी सिनेमात रितेशचं नाव माऊली होतं. त्यात तो माऊली आपल्या आईला न्याय मिळवून देतो. तिच्यासाठी प्राणाची बाजी लावतो, अशी गोष्ट होती. लय भारी सुपर डुपर हिट झाला होता. त्यामुळे लय भारी सिनेमाबद्दलही अपेक्षा आहेत.
रितेश देशमुखची बायको जेनेलिया या सिनेमाच्या निर्मितीचं काम पाहतेय. आता सगळ्यांना उत्सुकता आहे 21 डिसेंबरची.
हेही वाचा
सध्या रितेशला घेऊन रवी जाधव शिवाजी महाराजांवर सिनेमा करतोय. मध्यंतरी रायगडावरचे वादग्रस्त फोटोंमुळे रितेशला माफी मागावी लागली होती. किल्ले रायगडावरील राज सदरेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघ डंबरीत बसून त्यांनी फोटो काढले होते. त्यावेळी फार गदारोळ झाला होता. आणि म्हणूनच रितेशला ट्विट करून माफी मागावी लागली होती. सध्या रितेश हाऊसफुल4 सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.
बालक पालक आणि लय भारी या सिनेमांची निर्मिती केल्यामुळे आता रितेशकडून नेहमीच दर्जेदार सिनेमांची अपेक्षा आहे. म्हणूनच माऊली हा सिनेमा लय भारी ठरावा असं रसिक म्हणतायत.
‘माऊली’
21st Dec 2018@Riteishd @SaiyamiKher
Produced by
Mumbai Film Company @mfc & Hindustan Talkies
Directed by @AdityaSarpotdar
Music by @AjayAtulOnline
Written by @Kshitij_P pic.twitter.com/qhQ4tAPmVC
— Riteish Deshmukh (@Riteishd) 23 July 2018