• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : रितेशच्या 'माऊलीची' जादू पुन्हा चालणार का?
  • VIDEO : रितेशच्या 'माऊलीची' जादू पुन्हा चालणार का?

    News18 Lokmat | Published On: Dec 14, 2018 10:46 AM IST | Updated On: Dec 14, 2018 10:46 AM IST

    मुंबई, 14 डिसेंबर : 'आपलं नाव माहित नाय, असं एक बी गाव नाय....'अशा खुमासदार संवादांची मेजवानी असलेला 'माऊली' हा सिनेमा आज प्रदर्शित होत आहे. रितेश देशमुख यात पोलिसाच्या भूमिकेत दिसेल. तर बॉलिवूडमध्ये काम केलेली सैयामी खेर ही अभिनेत्री यानिमित्ताने प्रथमच मराठीत पदार्पण करत आहे.नुकताच सॅक्रेड गेम्स या वेबसिरिजमुळे प्रसिद्ध झालेला अभिनेता आणि कवी जितेंद्र जोशी यात खलनायकाच्या भूमिकेत असेल आणि सिद्धार्थ जाधवही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. जिओ स्टुडिओजची पहिली मराठी निर्मिती असून आदित्य सरपोतदारचं दिग्दर्शन, अजय-अतुल यांचं श्रवणीय संगीत अशी कलाकृती सिनेमात पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर रितेश देशमुखचा मराठी बाणा पाहायला प्रेक्षक गर्दी करतील अशी अपेक्षा आहे. प्रदर्शनापूर्वीच सिनेमाची गाणी आणि रितेश देशमुखचे संवाद प्रेक्षकांच्या ओठावर आहेत. 'माऊली' या सर्व अपेक्षा पूर्ण करणार का? बॉक्सऑफीसवर 'लय भारी'च्या कलेक्शनसारखा चमत्कार पुन्हा दाखवणार का? याकडे आता सिनेरसिकांचं लक्ष लागलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading